www.24taas.com, मुंबई
दिग्दर्शक - साजीद खान
प्रमुख भूमिका - अजय देवगण, तमन्ना भाटिया, परेश रावल, महेश मांजरेकर, झरीना वहाब, लीला जुमानी
साजीद खानचा बहुचर्चित ‘हिम्मतवाला’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. खास अजय देवगण टच असेलला हा सिनेमा सोनाक्षी सिन्हाच्या डिस्कोने सुरू होतो. जुन्या सिनेमाला नव्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला आहे. ३० वर्षापूर्वीच्या त्याच मसाल्याचा वापर आत्ताच्या हिम्मतवाला मध्ये करण्यात आला आहे.
कसे केलं कलाकारांनी काम
परेश रावल यांनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवून दिली आहे. त्यांच्या अभिनयची छाप त्यांनी पुन्हा एकदा या सिनेमावर सोडली आहे. ‘हिम्मतवाला’ या सिनेमातून तमन्ना भाटिया हिने पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ह्या सिनेमातीला तिच्या मादक अदांनी तिने प्रेक्षकांना मात्र चागंलचं घायाळ केलं आहे.
'हिम्मतवाला'ची स्टोरी'
एका गरीब आईच्या मुलाची ही कथा आहे. रवीचे (अजय देवगण) वडील एका खेडेगावात शिक्षक असतात, पण त्यांना गावातील गुंड ठार करतात. आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा आपल्या गावात परततो. गावात त्याची आई सावित्री (झरीना वहाब), बहीण पद्मा (लीला जुमानी) राहत असते. गावात परतल्यावर त्याचं आणि तमन्नाचं सूत जुळतं.
गावात येण्यापूर्वी तो ऍक्शन मास्टर म्हणून काम करीत असतो. तो पॉप स्टार मायकल जॅक्सनचा मोठा चाहता असलेल्या मायकल जयकीशन (चंकी पांडे) च्या क्लबमध्ये काम करत असतो.
‘नैनो में सपना’ आणि ‘ताकी ताकी’ ही गाणी प्रेक्षकांचा जुना मूड परत घेऊन येतात...एकूणच हिम्मतवाला या नव्या विषयाला जुन्या मेलोड्रामाचा तडका देण्यात आला आहे.