सूरजच्या `त्या SMS` नंतरच जियाची आत्महत्या...

जीया खान आत्महत्या प्रकरणी सुरज पंचोली अडचणीत येऊ शकतो. सुरजनं पाठवलेले काही अपमानकारक एसएमएस जीयाच्या मोबाईलमध्ये सापडलेत.

Updated: Jun 6, 2013, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जीया खान आत्महत्या प्रकरणी सुरज पंचोली अडचणीत येऊ शकतो. सुरजनं पाठवलेले काही अपमानकारक एसएमएस जीयाच्या मोबाईलमध्ये सापडलेत. या एसएमएसमुळे जीयानं आत्महत्या केली नसेल ना, या दिशेनं आता मुंबई पोलीस तपास करत आहेत.
`तू माझ्यावर करत असलेल्या हेरगिरीमुळे माझं आयुष्य कैद्यासारखं झालंय,` अशा आशयाचा अश्लाघ्य भाषेला SMS सूरजनं पाठवला होता. आत्महत्या करण्यापुर्वी थोडा वेळ आधीच हा एसएमएस जियाला आला होता. त्यामुळे सुरज पांचोलीची पोलीस चौकशी करीत आहेत.
दुसरीकडे अशाच प्रकारे आत्महत्या करणारी मॉडेल-अभिनेत्री विवेका बाबाजी प्रकरणाचा अभ्यासही मुंबई पोलिस करत असल्याचं एका अधिका-यानं सांगितलंय. यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, हा यामागचा उद्देश असल्याचं समजतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.