www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दगडू आणि प्राजक्ताच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यामुळे टाईमपासवर टीका करणाऱ्या चित्रपट विश्लेषकांना हा केमिकल लोचा असल्याचं म्हणून समाधान मानावं लागेल.
टाईमपासने पहिल्या दोन दिवसात पाच कोटी रूपयांची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकींसह हा सिनेमा ५ कोटी रूपयांपर्यंत गेला असला, तरी आठवडासंपेपर्यंत हा सिनेमा १० कोटीच्याही पुढे जाणार आहे.
भारतमाता सिनेमागृहात आगाऊ बुकिंगची सोय नसल्याने करंट बुकिंग सुरू आहे, यासाठी थियटरबाहेर प्रेक्षकांच्या तिकीटासाठी रांगा लागल्या आहेत. मराठी सिनेमांमध्ये आलेल्या नव्या ट्रेन्डमुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे धाव घेतली आहे.
आगाऊ बुकिंग न करता टाईमपास पाहण्याचं धाडस आज तरी करू नका कारण, टाईमपासचे सर्व शो आज दिवसभरासाठी हाऊसफुल आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटावर प्रेक्षकांनी उड्या टाकल्या आहेत. चित्रपट समिक्षकांनी टाईतोंडभरून टीका केली असली, तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाचं तेवढच तोंडभरून कौतुक केल आहे.
रवी जाधव यांनी ही चित्रपट दिग्दर्शित केला आहे. राज्यभरात अडीचशे थिएटरमध्ये हा शो सुरू आहे. टाईमपासचे दिवसाला ५ हजार विक्रमी शो हाऊसफुल्ल आहेत.
टाईमपास हा चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल असल्याने, टाईमपासचे मल्टीप्लेक्समध्ये दिवसाला १५ शो दाखवले जात आहेत. यापूर्वी दिवसाला सहा शो दाखवण्याचा विक्रम दुनियादारीने केला होता. रवी जाधव यांच्याच बालक पालकने दहा आठवड्यात १० कोटींची कमाई केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.