पूनम पांडेचा पहिला शॉट ‘बेड सीन’

वादांची खाण असलेल्या पूनम पांडेने आपला पहिला चित्रपट ‘नशा’ याची शुटिंग सुरू केली असून आपल्या ‘लौकिकाला साजेल असा पहिला सीन तिने निवडला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 7, 2012, 08:56 PM IST

www.24taas.com,मुंबई
वादांची खाण असलेल्या पूनम पांडेने आपला पहिला चित्रपट ‘नशा’ याची शुटिंग सुरू केली असून आपल्या ‘लौकिकाला साजेल असा पहिला सीन तिने निवडला आहे. तीने आपल्या पहिल्या चित्रपटाचा मूहूर्त सीन हा बेडरूमने सीनने दिला आहे.
जिस्म-२ चे फेमस डायरेक्टर अमित सक्सेना यांनाच फिल्म नशाचे डायरेक्शन केले आहे.

२१ वर्षीय पूनम पांडेने आपल्या ट्विटरवर टीवटीव करताना म्हटले आहे, की मी ऐकलं होतं की चित्रपट मिळविण्यासाठी पहिले बेडवर जावे लागते. पण मी तर माझ्या पहिल्या चित्रपटाच मुहूर्त शॉट हा बेडसीनपासून दिला आहे.
पूनमचा हा पहिला चित्रपट अडल्ट सिनेमा असून त्यात बरेच मसालेदार सिन असणार आहेत. या सिनेमाचा निर्माता अमित सक्सेना असणार आहे, असे काही दिवसांपूर्वी पूनमने ट्विट केले होते.
जिस्म - २ या सिनेमाची निर्मीतीही अमित सक्सेनानेच केली होती. सध्या तरी या सिनेमाच्या नावाबाबत पूनमने काहीही खुलासा केलेला नाही. सिनेमा फक्त तीन अक्षरांनी सुरू होईल. ज्याचं पहिलं अक्षर ए असणार, दुसरं अक्षर एच असेल तर एच फॉर हॅबिट आणि तिसरं अक्षर एस म्हणजे सेक्स. म्हणजेच सेक्सची सवय जडण्याविषयी पूनमने म्हटंले आहे.
पूनम म्हणते की, सेक्सबाबत आपण सुरवातीला अगदीच जुजबी गोष्टी करीत असतो. त्यानंतर हळूहळू ते आपल्याला आवडू लागतं त्यानंतर सेक्ससाठी काहीही करण्याची आपली तयारी असते. त्यानंतर ही आवड एवढी बळावते की, त्यासाठी आपण काय करतोय याचाही विचार करणं सोडून देतो. पूनमने तिच्या चाहत्यांना एक आश्वासन दिलं आहे की, या सिनेमात त्यांना फार मोठ्या प्रमाणात सेक्स दृश्य पाहायला मिळतील. पूनम म्हणते की, सिनेमा अडल्ट आहे, मात्र त्याची कथा फारच चांगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमने आपल्य आगामी चित्रपटासाठी फोटोशूट केला होता. त्यातील काही फोटो लिक झाले आहे. आप्लाय आगामी चित्रपटाबद्दल पूनम खूप उत्साहित आहे. आतापासून तीने याचे प्रमोशनही सुरू केले आहे. दरम्यान फोटो लीक हे पब्लिसिटी स्टंट असल्याचे जाणकारांचे मत आहे.