‘नीट काम कर, नाहीतर तुझी वाट लावून टाकेल’

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या बरीच चर्चेत आहे, मात्र ती तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर तरूण अभिनेत्यांना धमकवण्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

Updated: Mar 12, 2013, 12:31 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या बरीच चर्चेत आहे, मात्र ती तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर तरूण अभिनेत्यांना धमकवण्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. प्रियंका आणि शाहरूख खान ह्यांच्यातील गुफ्तगूमुळे बॉलिवूडमध्ये दोघांबाबत बरीच चर्चा रंगली होती. त्यामुळे शाहरूखची पत्नी गौरी खान हिच्या देखील भुवया उंचावल्या होत्या. पण आता बातमी आहे की, देशी गर्ल प्रियंका शाहरूखचं नाव घेत लोकांना धमकावते आहे.
नुकत्याच एका सिनेमाच्या शूटींग दरम्यान प्रियंका काही गोष्टी सांगत असताना एका तरूण अभिनेत्याने तिच्या गोष्टीकेड दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळे प्रियंका चोप्रा चांगलीच भडकली. आणि तिने रागात येऊन त्या अभिनेत्याला धमकीच दिली. ‘नीट काम कर नाहीतर शाहरूखला सांगून तुझी वाट लावून टाकेल.’
साहजिकच शाहरूखचं नाव येताच त्या तरूण अभिनेत्याने प्रियंकाच्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू केलं. पण तिच्या अशा बोलण्याने तो काही आश्चर्यचकीत झाला नाही, तर त्यांनी देखील माहिती आहे की, शाहरूख आणि प्रियंका याचं नातं आहे तरी काय. मात्र इतरांना असे वाटते की, प्रियंका ह्या सगळ्यांवर वरचढ असणाच्या आव आणते आहे आणि दाखविते की, ती शाहरूख खानच्या अगदीच जवळ आहे.