www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या शेवटच्या चित्रपटाला आता केद्रींय चित्रपट प्रमाणन मंडळच्या (सीबीएफसी) तर्फे यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट ‘रियासत’ आता लवकरच रिलिझ होणार आहे.
‘रियासात’ हा चित्रपट २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलिझ होणार होता. पण आता हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या ७१ व्या जन्मदिनाच्या दिवशी रिलिझ होणार आहे.
‘रियासत’ या आगामी चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक त्यागी यांनी सांगितले. पुढे बोलत असतांना त्यागी यांनी असे सांगितले की, हा चित्रपट राजेश खन्नाच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करणारा असल्याने हा चित्रपट त्याच्या पुण्यतिथीला रिलिझ करणे योग्य राहिल.
या चित्रपटाला आता यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे आणि आता रिलिझ होण्यासाठी हा चित्रपट पुर्णपणे तयार आहे. या चित्रपटात गौरी कुलकर्णी,आर्यमन रामसे आणि रजा मुराद यांनी काम केले आहे. त्यांगींना असे वाटते की, सुपरस्टारच्या ७१ व्या वाढदिवसाच्या २ दिवस आधी हा चित्रपट रिलिझ करणे योग्य ठरेल.
हिंदी चित्रपटाचे पहिले सुपरस्टार यांचे गती वर्षी आजारपणामुळे निधन झाले होते पण तरीही ते आपल्या यशस्वी चित्रपटांमुळे आजही अनेकांमध्ये जीवंत आहेत. राजेश खन्ना यांनी ‘आराधना’, ‘कटी पतंग’, ‘आनंद’, ‘अमर प्रेम’, ‘दो रास्ते’, ‘आन मिलो सजना’ असे हीट चित्रपट दिले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.