हृतिककडून १०० कोटी मागितल्याची बातमी धादांत खोटी - सुझान

‘वेगळं होण्यासाठी सुझान खाननं पती हृतिककडे पोटगीपोटी १०० कोटी मागितले’ ही मीडियानं दिलेली बातमी धादांत खोटी असल्याचं सुझाननं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2013, 08:21 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘वेगळं होण्यासाठी सुझान खाननं पती हृतिककडे पोटगीपोटी १०० कोटी मागितले’ ही मीडियानं दिलेली बातमी धादांत खोटी असल्याचं सुझाननं म्हटलंय.
‘सुझान आणि हृतिकचा घटस्फोट : १०० करोडोंची सेटलमेंट... अशा मथळ्याची बातमी पाहून मला प्रथम धक्काच बसला. यामुळे मी खूपच निराश झालेतय. या बातमीमध्ये काहीही सत्य नाही... ही धादांत खोटी आणि काल्पनिक बातमी आहे’ असं सुझाननं म्हटलंय.
‘कुणाच्याही खाजगी जीवनावर आणि संबंधांवर अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणं ही अनैतिक गोष्ट आहे’, असंही क्रोधीत सुझाननं म्हटलंय.
१३ डिसेंबर रोजी, सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, असं हृतिकनं जाहीर केलं होतं. तब्बल चार वर्ष एकमेकांसोबत डेटिंग केल्यानंतर उभयतांनी लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. २० डिसेंबर २००० रोजी त्यांचं लग्न झालं होतं. या जोडप्याला रिहान आणि रिधान अशी दोन मुलंही आहेत.
‘वेगळं झाल्यानंतरही हृतिकला आणि मला एकमेकांबद्दल आदर आहे आणि यानंतरही आमचं दोघाचीही प्राथमिकता आमच्या मुलांनाच असेल, असं सुझाननं म्हटलंय. तरी, मी विनंती करते की, आमच्या आयुष्यातील या कठिण प्रसंगी आमच्या खाजगी आयुष्याचा आदर करा’ असं सुझाननं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.