www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जाहीरातींसाठी बॉलिवूडचे स्टार कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात. मात्र जेव्हा सर्व्हिस टॅक्स भरण्याची वेळ येते, तेव्हा हेच कलावंत आणि निर्माते हात आखडता घेतात. झी मीडियाच्या हाती आलेल्या विशेष माहितीनुसार आता सेवा कर विभागाने कर चुकवणा-या सेलीब्रेटींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
उत्पन्नामध्ये कोटींची उड्डाणे घेणारे कलावंत कर भरताना मात्र खाली येतात. कर चुकवण्याकडे अनेक स्टार्सचा कल असतो. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. करबुडव्या सेलिब्रेटींवर सेवा कर विभाग करडी नजर ठेवून आहे.
दोन आठवड्यात कर चुकवणा-यांवर कारवाईचे संकेत सर्व्हिस टॅक्स विभागानं दिलेत. सुरुवातीला नोटीस देण्यात येईल. मात्र तरीही कर भरणा न झाल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. त्यात बँक खात सील करण्याबरोबरच गुन्ह्यांची नोंद केली जाणार आहे. सेवा करांच्या नियमानुसार 50 लाखांपेक्षा जास्त कर चुकवणा-यांना सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
हल्ली हे स्टार्स जितकी कमाई चित्रपटातून करत नाहीत, त्यापेक्षा जास्त ते जाहिरातीतून कमावतात. जाहिरात क्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार शाहरूख खान जाहिरातीसाठी दिवसाला साडे चार ते पाच कोटी रुपये घेतो, आमिर खान त्यासाठी 4 कोटी, तर सलमान खान 3 कोटी रुपये घेतो. याशिवाय अक्षय कुमार, रणबीर कपूर 2 कोटी घेतात, तर अमिताभ बच्चन, करीना कपूर, कैटरीना कैफ आणि ऐश्वर्या राय बच्चन दीड ते दोन कोटी रुपये मानधन घेतात.
सेवा कर विभागाची बॉलीवूडप्रमाणेच जाहीरात विश्वावरही करडी नजर आहे. या दोन्ही इंडस्ट्रीमधून जवळपास पाचशे कोटींची करवसुली होण्याची अपेक्षा सेवा विभागाला आहे. मात्र कर चुकवणा-या सेलिब्रेटींची नावं कर विभागानं जाहीर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.