www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता इम्रान हाश्मी याच्या चार वर्षांच्या कोवळा मुलगा – अयान कँन्सरशी लढतोय. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगण्यात आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयानच्या किडनीमध्ये असलेल्या कँन्सरच्या गाठिला यशस्वीरित्या काढण्यात आलंय. बुधवारी, अयानला कँन्सर असल्याचं उघड झालं होतं. ‘जन्नत’ फेम इम्रानचे काका महेश भट्ट यांनी एका दैनिकाशी बोलताना ही माहिती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अयानवर योग्य उपचार व्हावेत यासाठी, या गाठिला परदेशात पाठवण्यात आलंय. एका आठवड्यात याचा रिपोर्ट अयानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हाती येईल, त्यानंतर पुढचे उपचार सुरु केले जातील. हे ऑपरेशन मुंबईतील हिंदुजा हॉस्पीटलमध्ये पार पडलं.
मुंबईतील हिंदुजा हॉस्पीटलमध्ये कोवळ्या अयानच्या किडनीत डॉक्टरांना गाठ आढळली होती. यामुळे अयानच्या जीवालाही धोका होता. पण, सुदैव म्हणजे अयानचा कँसर पहिल्याच स्टेजमध्ये असतानाच डॉक्टरांना याचा थांगपत्ता लागला आणि डॉक्टरांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरू केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.