www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पूनम पांडे हिचा पहिला सिनेमा ‘नशा’ रिलीजच्या मार्गावर आहे. या सिनेमातील पूनम पांडेच्या कामावर मुकेश भट्ट यांनी स्तुती सुमनं उधळली आहेत. तसंच दिग्दर्शक अमित सक्सेनाचंही कौतुक केलं आहे.
“पहिल्याच सिनेमात पूनमने ज्या पद्धतीने काम केलंय ते वाखाणण्यासारखं आहे. दिग्दर्शक अमित सक्सेनाने अत्यंत योग्य पद्धतीने पूनमला प्रस्तुत केलं आहे. इतर कुणालाही अशा पद्धतीने तिला सादर करणं शक्य झालं नसतं. पूनम पांडे भविष्य निश्चितच आशादायक आहे, असं तिच्या कामावरून वाटतं.” अशा शब्दांत मुकेश भट्ट यांनी पूनम पांडे आणि अमित सक्सेनाचं कौतुक केलं. अमित सक्सेनाने यापूर्वी बिपाशा आणि जॉनचा जिस्म हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. तर पूनमने भारत विश्वचषक जिंकवल्यावर नग्न होण्याचा इच्छा व्यक्त करत प्रसिद्धी मिळवली होती.
नशा सिनेमात एका १८ वर्षीय मुलाची २५ वर्षीय मुलीसोबत असणारी प्रेमकाहाणी आहे. या सिनेमात अनेक उत्तेजक आणि नग्न दृश्यं असल्याचं म्हटलं जात आहे. या बद्दल विचारलं असता मुकेश भट्ट म्हणाले, की जर तुमचं शरीर सुंदर असेल, तर नग्न होऊन अंगप्रदर्शन करण्यात काहीच गैर नाही. दुसऱ्याच्या शरीराबद्दल चूक की बरोबर असा आग्रह धरण्याचा नैतिक अधिकार आपल्याला कुणी दिला? सिनेमाच्या कथेनुसार नग्नता ही सिनेमाची गरज आहे आणि पूनम आपलं काम प्रामाणिकणे करत आहे, असं मुकेश भट्ट म्हणाले
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.