www.24taas.com , झी मीडिया, पुणे
बालगंधर्वमध्ये आज होणारा संजय दत्तचा `महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन` हा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणामुळंच हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारागृहाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले.
लवकरच येरवडा जेलमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. आज कार्यक्रम रद्द करावा लागल्याचं दु:ख आपल्यालाही आहे असं पुणे पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी सांगतिलंय. कार्यक्रमाला असलेला धोका पाहून तसंच त्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती, यामुळं आम्ही हे पाऊल उचललंय, असं मीरा बोरवणकर म्हणाल्या.
तुरुंग विभागाच्या कल्याणकारी योजनांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सायंकाळी ४ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात संजय दत्त नाटिका आणि नृत्य सादर करणार होता.
या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली होती. ५० हून अधिक कैदी यात सहभाग घेणार होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालीमही सुरू होती. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्या लोकांनी या कार्यक्रमाची तिकीटं विकत घेतली आहेत त्यांना पैसे परत केले जाणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.