www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडमधील खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रकृती खालावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशक्तपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्राण यांच्या निकटवर्तींनी सांगितले. प्राण यांचे सध्याचे वय ९२ वर्ष आहे. गेल्या सहा दशकांपासून प्राण यांनी बॉलिवूडमधील सुमारे साडेतीनशे चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. प्राण यांच्या प्रकृती स्वास्थासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.
लीलावती हॉस्पिटलचे प्रवक्ता डॉ. सुधीर दगाओकर यांनी सांगितले की, गेल्या शुक्रवारी प्राण यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. परंतु, श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असून ते अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे.
त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘खानदान’, ‘औरत’, ‘बड़ी बहन’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘हाफ टिकट’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘डॉन’आणि ‘जंजीर’ यांचा समावेश आहे. भारत सरकारने त्यांना भारतीय सिनेमाच्या योगदानासाठी पद्म भूषण पुरस्कार २००१मध्ये देण्यात आला आहे.