अभिनेत्री विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात

आता काही दिवसांपूर्वीच विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. मात्र तिनं त्यावर स्पष्टीकरण देत आपण प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र ता विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात असल्याची चर्चा आहे. विद्याचा नवरा प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर याच्या आयुष्यात कोणीतरी नवीन अभिनेत्री आल्यानं विद्या नाराज असल्याचं कळतंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 6, 2014, 05:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता काही दिवसांपूर्वीच विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची चर्चा होती. मात्र तिनं त्यावर स्पष्टीकरण देत आपण प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र ता विद्या बालनचं वैवाहिक जीवन संकटात असल्याची चर्चा आहे. विद्याचा नवरा प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूर याच्या आयुष्यात कोणीतरी नवीन अभिनेत्री आल्यानं विद्या नाराज असल्याचं कळतंय.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ रॉय कपूर एका नवख्या अभिनेत्रीचं प्रमोशन करण्यात खूप दंग आहे. विद्या आपल्या पतीच्या या वागण्यानं नाराज आहे. म्हणूनच तिनं आता आपले सर्व परदेशी दौरे सुद्धा कॅन्सल केले आहेत. जेव्हा संपूर्ण बॉलिवूड आयफा पुरस्कारांसाठी अमेरिकेला गेलं होतं. तेव्हा विद्या मुंबईतून हललीही नाही. विद्या सिद्धार्थवर नजर ठेवून होती, असं कळतंय.
वृत्तानुसार सिद्धार्थची लग्नानंतर आणखी एका अभिनेत्रीसोबत जवळीक वाढली. विद्या शूटिंगच्या निमित्तानं देशाबाहेरच असायची, तेव्हा हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणावरून विद्या आणि सिद्धार्थमध्ये भांडणंही होतायेत.
यामुळंच विद्या बालन आगामी चित्रपट बॉबी जासूसच्या प्रमोशनकडे लक्ष देत नाहीय. प्रमोशनला उशीर होतोय. मागील काही आठवड्यांपासून विद्या आपल्या आई-वडिलांच्या घरी चेंबूरलाही सतत जातेय. विद्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की आपलं लग्न टिकवण्यासाठी विद्या सर्व ते प्रयत्न करतेय.
सिद्धार्थ रॉय कपूरचं हे तिसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न लहानपणीच मुहब्बत नावाच्या मुलीसोबत झालं होतं. तर दुसरी पत्नी ही प्रोड्यूसरचं काम करायची. तिच्यासोबत सिद्धार्थचा २०११मध्ये घटस्फोट झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.