www.24taas.com, झी मीडिया, दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर झेपावलीय. रविवारी आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीयादीत भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. पहिल्या स्थानाचा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकवला आहे.
कसोटी संघांच्या यादीत भारताचे ११९ गुण आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या गुणांत फक्त १२ गुणांचा फरक आहे. भारतीय संघ हा डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तसंच त्यांच्या सोबत कसोटी आणि एकदिवसीय मालिका ही खेळणार आहे. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून भारत अव्वल स्थानी येवू शकतो. त्या आधीच ही क्रमवारी जाहीर करण्यात आलीय.
सध्या भारतीय संघ हा चांगल्या फॉममध्ये आहे त्यामुळं त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. भारतीय फिरकीपटू आर. आश्विन हा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. तसंच फलंदाजांच्या यादीत भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर आहे. तर त्यांच्याच मागं विराट कोहली आहे. गोलंदाजांच्या यादीत आर. आश्विन पाचव्या आणि प्रग्यान ओझा नवव्या स्थानावर आहे. तसंच विंडीज सहाव्या आणि न्यूझिलंड आठव्या स्थानावर आहे. ह्या दोन्ही संघात लवकरच तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळं या दोन्ही संघास वरच्या स्थानावर झेपवण्याची संधी आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ