www.24taas.com, झी मीडिया, लोहिया
हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.
वासिम जाफर आणि कौस्तुभ पवार ही ओपनिंग जोडी ३२ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर... पीचवर आलेल्या सचिननं अजिंक्य रहाणेच्या साथीनं मुंबईची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा... मात्र अवघ्या ५ रन्सवर असताना मोहित शर्मानं त्याला बोल्ड करत मुंबईला तिसरा धक्का दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सचिनच्या करिअरमधील ही अखेरची रणजी मॅच आहे. त्यामुळं विंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजपूर्वी फॉर्मात येण्याकरता हरयाणाविरूद्धची ही मॅच सचिनसाठी महत्त्वाची आहे. दरम्यान मुंबईतर्फे अभिषेक नायरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेत हरयाणाची इनिंग झटपट गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.