बंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.

Updated: Jan 20, 2014, 06:44 PM IST

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे.
महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.
महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी इंदूरच्या उपांत्य सामन्यात, बंगालचा दुसरा डाव ३४८ धावांत आटोपला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात ३४१ धावांची आघाडी घेतली, आणि महाराष्ट्रानं विजयासाठी आवश्यक ८ धावांचं लक्ष्य पहिल्याच षटकात पार केलं.
अनुपम संकलेचा आणि डॉमनिक जोसेफ यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ५८ धावांत बंगालच्या ७ फलंदाजांना माघारी धाडणारा समद फल्ला दुसऱ्या डावातही यशस्वी ठरला. तसेच त्यानं दुसऱ्या डावात ३ फलंदाजांना माघारी धाडलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.