धोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा

सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2013, 07:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.
अप्पर जिल्हाधिकारी (एडीएम) न्यायालयात हा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये हिंदुस्थानचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, गौतम गंभीर व झहीर खान या दिग्गजांचा समावेश आहे.
शिवाय हृतिक रोशन व प्रियंका चोप्रा या स्टारनाही या गुन्ह्यात प्रतिवादी बनविण्यात आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.