www.24taas.com, झी मीडिया, मेनॉस
विश्व चषक फुटबॉल टूर्नामेंटमध्ये शनिवार ग्रुप-डीच्या सामन्यात इंग्लंड आणि इटलीत सामना झाला, इटलीने इंग्लंडवर विजय मिळवलाय. या आधी या ग्रुप मध्ये सामिल असलेल्या कोस्टारिकाने उरुग्वे ला 3-1 से हरवलं होतं.
मारियो बालोटेलीच्या गोलच्या मदतीने इटलीने इंग्लंडवर 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवला. 2006 ची चॅम्पियन टीम इटलीने इंग्लंडला 2-1 ने हरवलंय.
1966 मध्ये विश्व चषक आपल्या नावे करणाऱ्या इंग्लंड आणि चार वेळेस चॅम्पियन असलेल्या इटलीने आपल्या खेळाची सावध सुरूवात केली होती.
मार्को वेरातीच्या पासवर मारकिसियोने 35 व्या मिनिटाला गोल केला आणि इटलीला आघाडी मिळाली. मात्र इटलीची आघाडी मोडण्यात दोनच मिनिटांनी इंग्लंडला यश आलं.
वेन रुनीच्या सुरेख पासवर डॅनियल स्टुरिजने गोल केला आणि इंग्लंडला बरोबरी मिळाली. मात्र इंग्लंडला बरोबरी टिकवून ठेवण्यात काही यश आलं नाही.
मध्यांतरानंतर 50 व्या मिनिटाला मारियो बालोटेली गोल केला आणि इटलीला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. इटलीच्या या विजयामुळे ग्रुप डीची लढाई आणखी चुरशीची बनली असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.