युवराजला सिद्ध करण्याची हीच वेळ योग्य – धोनी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युवराज सिंगनं पुन्हा एकदा विश्वास कमावलाय, असं भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय.

Updated: Mar 31, 2014, 01:02 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मीरपूर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युवराज सिंगनं पुन्हा एकदा विश्वास कमावलाय, असं भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय.
युवराजच्या शानदार ६० रन्समुळं भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं. सुरुवातीला युवराजला मैदानावर सेट व्हायला वेळ लागला, मात्र आम्हाला माहित आहे की, तो एकदा सेट झाल्या तर कोणत्या प्रकाराचा खेळाडू आहे. युवराज जगातील कोणत्याही मैदानावर चौकार, षटकार मारु शकतो. इतकचं नव्हे तर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांवरही रन बनवू शकतो असं, धोनीनं पत्रकार परिषदेत म्हटलं.
धोनीनं सांगितलं की युवराजला स्वत:ला सिद्ध करायची ही वेळ होती आणि त्यानं हे करुन दाखवलं. मला आशा आहे की, माझी टीम एकत्रपणे चांगला परफॉर्मन्स दाखवेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.