भारतानं ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत गुंडाळलं

ढाका: भारताने ट्वेण्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत ऑलआऊट केलंय. भारताचा हा सलग चौथा विजय नोंदवला आहे. भारताने सामना 73 धावांनी जिंकलाय.

Updated: Mar 30, 2014, 10:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ढाका
ढाका: भारताने ट्वेण्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत ऑलआऊट केलंय. भारताचा हा सलग चौथा विजय नोंदवला आहे. भारताने सामना 73 धावांनी जिंकलाय.

आर अश्विननं 4 तसेच अमित मिश्रानं ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स काढल्या.

युवराज सिंहने आज चांगली खेळी केली. युवीने 43 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांसह 60 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यामुळेच भारताला वीस षटकांत 7 बाद 159 धावांवर मजल मारता आली.

या सामन्यात भारताकडून सलामीसाठी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात उतरले होते. मात्र रोहित 5 धावा करून बाद झाला. तर रहाणेने 19 धावा केल्या. त्यानंतर रैनाही अवघ्या 6 धावा करून तबुंत परतला.

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले होते. सलामीवीर शिखर धवनच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला, तर मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीऐवजी मोहीत शर्माला स्थान देण्यात आलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.