पाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवर

महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.

Updated: Jun 12, 2012, 06:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १.०० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर,अमरावती, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ प्रभागांमधून दहावीचा निकाल जाहीर होईल. दहावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थ्यांना खालील वेबसाइट्सवर आपले निकाल पाहाता येतील-

 

१.         http://mahresult.nic.in

 

२.         www.msbshse.ac.in

 

३.         http://sscresults2012.in

 

४.         www.mh-ssc.ac.in

 

५.         www.sscresult.mkcl.org

 

६.         www.exametc.com

 

७.         www.results.bharatstudent.com

 

८.         www.myssc.in

 

९.         www.studyssconline.com

 

१०.        www.rediff.com/exams

 

 

गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी दहावीची मार्क शीट बेस्ट-५ च्या आधारावर तयार करण्यात आली असेल. २२ जूननंतर विद्यार्थी आपली मूळ मार्क शीट आपल्या शाळेमधून मिळवू शकतात. एचएससी म्हणजेच १२वीचा निकाल बोर्ड २५ मे रोजी जाहीर केला होता. ‘२४तास.कॉम’तर्फे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘हार्दिक शुभेच्छा’!