‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!

स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2013, 07:05 PM IST

www.24taas.com, जी मीडिया, मुंबई
स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.
आपल्या परवानगीशिवाय हे परिपत्रक काढण्यात आल्याचा दावाही राजेंद्र दर्डा यांनी ‘झी मीडिया’शी बोलताना केलाय. परिवहन विभागानं याबाबत आपली कुठलीही परवानगी घेतलेली नाही, असं स्पष्टिकरणही दर्डांनी दिलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा जीआर शालेय शिक्षण मंत्रालयानंच काढल्याचं स्पष्ट आहे.
सह-सचिवांच्या सहीनं निघालेल्या या परिपत्रकाबाबत त्याच खात्याच्या मंत्र्यांना कोणतीही माहिती नसल्याचं समोर आल्यानं एकूणच शालेय शिक्षण विभागातला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.