राज्यातील खासगी शाळांचा सोमवारी संप

राज्यातील सर्व खाजगी शाळा सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहे.. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची औरंगाबादेत हा इशारा दिलाय. औरंगाबादेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jun 30, 2012, 09:32 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

राज्यातील सर्व खासगी शाळा सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची औरंगाबादेत हा इशारा दिलाय. औरंगाबादेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राज्यात एकूण खाजगी शाळांच्या 21 टक्के म्हणजे सुमारे 25 हजार खाजगी शाळा आहेत. यासर्व खासगी शाळा शासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी बंद राहणार आहे. कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, तसचं फी ठऱण्याचे अधिकार द्यावे यासह खासगी शाळांच्या काही मागण्या आहेत.

 

या सगळ्या मागण्यांबाबत संस्थाचालकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली होती, मात्र त्यातून काही विशेष साध्य झाले नाही त्यामुळे 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. जर 16 जुलैपर्यंत संस्थाचालकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे..