सीबीएसई परीक्षेत मुंबईची बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या चेन्नई क्षेत्रातील मुंबई विभागाचा निकाल ९५.१६ टक्के लागला. देशातील अन्य विभागांच्या तुलनेने सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातच उत्तीर्ण झाले आहेत. आर. एन. पोदार स्कूलचा चिराग आपटे (९८) हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मुंबई विभागातून टॉपर आला.

Updated: May 29, 2012, 12:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला.  या परीक्षेच्या चेन्नई क्षेत्रातील मुंबई विभागाचा निकाल ९५.१६ टक्के लागला. देशातील अन्य विभागांच्या तुलनेने सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातच उत्तीर्ण झाले आहेत. आर. एन. पोदार स्कूलचा चिराग आपटे (९८)  हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मुंबई विभागातून टॉपर आला.

रिझल्ट पाहाण्यासाठी इथं क्लिक करा

मुंबईत आर. एन. पोदार स्कूलचेच सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा या शाळेतून २७५  विद्यार्थ्यांनी सीबीएसईची बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी १५४  विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. याच शाळेतील अनन्या माथुर ही विद्यार्थिनी ६५.६० टक्के गुण मिळवून ह्युमॅनिटिज या शाखेतून टॉपर आली. तर पोदार स्कूलची रोशनी सुंदररामन हिने वाणिज्य शाखेत टॉपर्समध्ये येण्याचा मान मिळवला आहे.

कांदिवली येथील रियान इंटरनॅशनल स्कूलचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यापैकी विज्ञान शाखेतून दिवेश जैन या विद्यार्थ्याने ९४.४ टक्के गुण मिळवले असून, त्या खालोखाल हितेशी गुप्ताने वाणिज्य शाखेतून ८0 टक्के गुण मिळवले आहेत. मुंबईत सर्वाधिक निकाल पोद्दार स्कूलचा लागल्याची माहिती स्कूलच्या उपप्राचार्या सुनीता जार्ज यांनी दिली.

सीबीएसईच्या बारावी परीक्षेसाठी मुंबई विभागातील केंद्रीय विद्यालय संघटनेच्या शाळांमधून यंदा तीन हजार ३२७  विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी तीन हजार १६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दरम्यान, टॉपर आलेला चिराग आपटे म्हणाला,  बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, असे ठरवून मी अभ्यास केला. त्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षकांसोबतच माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला चांगली मदत केली.

आखणी संबंधित बातमी

सीबीएसई परीक्षेतही मुलीच अव्वल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा बारावी - वर्ष १०१२चा निकाल नुकताच जाहीर झालाय. याही परिक्षेत मुली मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.