www.24taas.com, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यातल्या वायंगणीच्या बीचवर ७७ रिडले कासवांच्या पिलांना जीवनदान देण्यात आले आहे. या पिलांना सुखरुप समुद्रात सोडण्यात आले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडमधील वेळास सागरकिनारीही अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याठिणी कासवांच्या पिलांसाठी घरे तयार केली जातात. त्यानंतर त्या पिलांना समुद्रात सोडून दिले जाते. चिपळुणातील आणि दापोलीबरोबरच मंडणगडमधील निसर्गप्रेमी यासाठी खूप मेहनत घेत आहेत. वेळास सागरी किनारा हा पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.
मादी कासवानं अंडी घातल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याचा उपक्रम इथल्या कासवप्रेमीनं राबविला आहे.समुद्रात वेगाने धाव घेणारी ही कासवाची पिल्लं. एक नाही, दोन नाही तर तब्बल ७७ कासवांच्या पिलांना नवसंजीवनी मिळाली आहे.
वेंगुर्ल्यातील सुहास तोरसकर हा कासवप्रेमी युवक या कासवांचा तारणहार ठरला आहे. रिडले जातीची ही कासवं अंडी घालण्यासाठी दरवर्षी वेंगुर्ल्यातल्या वायंगणीच्या बीचवर येतात. नखांनी केलेल्या एका खड्ड्यात शंभर सव्वाशे अंडी घालून मादी कासव पुन्हा समुद्रात जाते.
मात्र, या अंड्यांना कुत्रे आणि आसपासचे नागरिक खाण्यासाठी नेतात. मात्र त्यांना संरक्षण देण्याचं काम सुहास गेल्या सहा पाच-सहा वर्षापासून करतोय. कासव संरक्षणाच्या या कामात तोरसकर यांना वनविभागाकडूनही मदत मिळते. कासवांच्या अनेक जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत सुहास तोरसकर सारख्या युवकाने कासवांच्या रक्षणाचा उचललेला विडा नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="79195"]