सागरी सुरक्षा तपासणी, झी २४ तासच्या डोळ्यांनी

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का हे तपासून बघण्यासाठी झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले.

Updated: Nov 26, 2011, 02:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का? की हा ही दावा फोलच ठरला.  हे तपासून बघण्याचं झी चोवीस तासच्या टीमनं ठरवलं आणि झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले

मुंबईत ज्या मच्छिमार कॉलनीच्या किनाऱ्यावर दहा पाकिस्तानी दहशतवादी उतरले होते, त्या किनाऱ्यावर आमचे प्रतिनधी सुरक्षा पाहायला गेले. आमची टीम या किनाऱ्या जवळ उभारलेल्या पोलीस चौकी जवळ पोहचली. दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष उलटून गेल्यानंतरही याठिकाणी एक चांगली पोलीस चौकी उभी राहू शकली नाही. याहून अधिक गंभीर काय असू शकेल?   या सागरी किनाऱ्यावर पोलीस तैनात आहेत, मात्र समुद्रात गस्त घालण्यासाठी जी मरीन गाडी त्यांना देण्यात आली आहे,  तिची अवस्था वाईट आहे.

 

दीड वर्षांपूर्वी ही गाडी ह्या किनाऱ्यावर आणण्यात आली होती.आज ही गाडी या किना-याच्या बाजूला धूळ खात पडलीय. या गाडीचे लाईट्स फुटलेले आहेत, गाडीचा बहुतेक भाग गंजलेला आहे आणि म्हणूनच, या गाडीकडून काय अपेक्षा करावी हा प्रश्न इथे राहणारा कोळी बांधव विचारतोय.

 

मच्छिमार कॉलनी नंतर आम्ही निघालो नरीमन पाँईंटचा दिशेनं...

 

आम्ही हा संपूर्ण परिसर फिरलो. पण कुठेही एकही पोलीस आम्हला दिसला नाही. कित्येक वर्षांपासून या ठिकाणी वावरणाऱ्या फेरीवाल्यांशी आम्ही बातचित केली. स्थानिक पोलीस दर एक ते दोन तासाने इथे फेऱ्या मारतात,अशी माहिती त्यांनी पुरवली. पण हा बंदोबस्त खरोखरच पुरेसा आहे काय  ? हा किनारा सुरक्षित ठेवण्यासाठी इथे तातडीनं एक पोलीस चौकी उभारण्यात यावला हवी. कारण, ट्रायडेंट हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी ह्याच नरीमन पॉईंटचा किनाऱ्यावर उतरले होते.

 

पुढे आम्ही निघालो अक्सा बीचचा दिशेने. ह्या बीचवर पोलीस  सज्ज असल्याचं आम्हाला दिसून आलं. इतकंच नव्हेतर या बीचवर वावरणाऱ्या स्थानिकांनीही २४ तास पोलिसांच्या उपस्थितीला दुजोरा दिला.

गिरगांव, जूहू, वांद्रे, दादर आणि माहिम समुद्र किनाऱ्यांवरही पोलिसांची चांगली गस्त असल्याचं जाणवलं..

या गजबजलेल्या किनाऱ्यांहून पुढे जात आम्ही पोहचलो मड आयलंडवर. शहरापासून दूर आणि निर्मनुष्य असलेल्या ह्या बीचवर फारच कमी गर्दी आम्हाला आढळून आली. इथल्या स्थानिक कोळी बांधवांशी आम्ही पोलीसांचा गस्ती बद्दल चौकशी केली. तेव्हा इथे पोलिसच नसल्याचं समजलं.  पोलिसांच्या अनुपस्थितीच कळाल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, दूरवर पसरलेल्या या बीचवर कोणीही आरामात येउ शकतो. २६/११ प्रमाणे या बीचवरही दहशतवादी येऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. दहशतवाद्यांचा कल्पनेनेच येथील स्थानिक नागरिकांचा अंगावर शहारे येतात.

 

दहशतीत जगत असलेल्या मुंबईतील सागर किनाऱ्यांचा सुरक्षेचा आढावा घेण्याचा आमचा तपास आता शेवटचा टप्प्यात पोहचला. आमची टीम पोहचली मार्वे बीचवर.मार्वे आणि मनोर गांवाला जोडणारा ह्या किनाऱ्यावर आम्ही फिरलो. इथल्या स्थानिकांशी सुरक्षेसंदर्भात विचारपूस केल्यानंतर जी माहिती आम्हाला मिळाली ते ऐकल्यानंतर कानांवर विश्वासच ठेवता येईना..  १९९३ आणि २००८ साली केलेल्या चुकानंतर सुद्धा प्रशासनाने कोणाताही धडा घेतला नसल्याचे आमचा तपासात दिसून आलं. प्रत्येक प्रसिद्घ बीचवर पोलीस तैनात आहेत पण निर्जनसागरी किनाऱ्यांवर सुरक्षेसाठी एकही पोलीस तैनात नाहीत.

 

दहशतवादी मुंबईत दाखल होण्यासाठी असाच निर्जन समुद्र किनाऱ्यांचा वापर करत असल्याचे इतिहासात आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे आणि म्हणूनच सरकारनं फक्त पोकळ दावे करणं सोडून मुंबईचा सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवं, हे या निमित्तानं पुन्हा समोर आलं.

 

सागरी किनाऱ्यांचा सुरक्षेचा आमच्या तपासाचा शेवटचा किनारा म्हणजे रायगड. १९९३ ला रायगडमधल्या सागरी किनाऱ्याचा वापर दहशतवाद्यांनी आरडीएक्स उतरवण्यासाठी केला होता. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या इथल्या किनाऱ्यांची सुरक्षा कशी आहे याचा आढावा आम्ही घेतला. रायगडमधील शेखाडी किनाऱ्यावरूनच १९९३ला याच किनाऱ्यावरून दाऊदने पाकिस्तातून पाठवलेला आरडीएक्सचा साठा उतरला होता.

त्या घटनेन