www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहवं लागतं. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा.
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय. तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे. शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं कौडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात येते.
प्राण्यांबद्दल असलेल्या कृतज्ञ भावनांचा उत्सव म्हणजे बैल पोळा. मात्र याच दिवशी राज्यातल्या काही गावांमध्ये बैलांच्या शर्यती भरवल्या जातात. शर्यतीत सहभागी होणा-या बैलावर अमानवी अत्याचारही होतात.बैलांची होणारी ही परवड थांबावी अशी मागणी प्राणीमित्रांकडून केली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.