इंडिया @ 13

इंडिया @ 13..वरवर पाहता हे भलेही टिनएजर्स शाळकरी मुलं आहेत. पण हिच मुलं देशाचे भविष्य आहेत. उद्याचा भारत कसा असेल. कसा दिसेल.. हे यांच्याकडून कळू शकेल..तेव्हा नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही अशाच काही टीनएजर्सच्या जीवनशैलीची तुम्हाला ओळख करुन देणार आहोत...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 2, 2013, 11:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
इंडिया @ 13..वरवर पाहता हे भलेही टिनएजर्स शाळकरी मुलं आहेत. पण हिच मुलं देशाचे भविष्य आहेत. उद्याचा भारत कसा असेल. कसा दिसेल.. हे यांच्याकडून कळू शकेल..तेव्हा नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही अशाच काही टीनएजर्सच्या जीवनशैलीची तुम्हाला ओळख करुन देणार आहोत...वाय टू केच्या काळात म्हणजेच २००० साली ज्यांचा जन्म झाला आणि आता २०१३मध्ये त्यांनी १३ व्या वर्षात पदार्पण केलंय..मुंबईतील काही अशाच टीनएजर्सकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

मित्र- मैत्रिणी एकत्र आले म्हणजे धमालमस्ती ठरलेलीच. पूर्वीही मुलं मित्र किंवा मैत्रिणीसोबत फिरायला जात असतं.पण आजच्या टीनएजर्सने फिरायला जाण्याचा ट्रेंड बदलून टाकला आहे...मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी जाण्याचा पूर्वीचा प्रकार आता कमी झाला आहे...कारण एसएमएस, गुगल चॅट, व्हॉट्सअप,फेसबुक,ट्वीटरवरुनच गप्पा होतात..त्यातही अनेक वेळा ह्यूमन चॅटसाठी व्ही़ड़ीओ मेसेजेचा वापर केला जातो. कळलं नाही ना ? खरं तर तुम्हाला ते कळणार नाही..कारण ही आजच्या पिढीची भाषा आहे...पण आम्ही तुम्हाला ती समजावून सांगणार आहोत..
श्राबोनी नावच्या मुलीसाठी एक मेसेज आहे..पण तिचं नाव आता श्रब्स असं उच्चारलं जातंय.तसेच संध्याकाळी सात वाजता मॉलमध्ये भेटण्यासाठी तिला मैत्रिणीने बोलवलं आहे.गॅझेटच्या युगातील टीनएजर्सची ही नवी भाषा आहे...आणि या भाषेत त्यांचा आपसात संवाद सुरु असतो..

गॅजेटस, ब्रॅडस आणि स्टाईल.. टीनएजर्ससाठी हे सारं महत्वाच ठरत .. आपला लुकच नाही तर फर्स्ट लुकही त्यांच्यासाठी नेहमीच महत्वाचा असतो.त्यामुळेच प्रत्येक ऋतूसोबत त्यांचा लुक आणि ट्रेंडही बदलत असतो...या नव्या वर्षात त्यांनी कोणता ट्रेंड निवडलाय त्यावर एक नजर टाकूया...
स्टायलिस्ट आणि ट्रेंडी दिसण्यासाठी काय करायला हवं हे स्टुडंट्सना चांगलच माहित आहे..हिवाळ्यात कोणतं जॅकेट आणि स्कार्फ घातल्यानंतर स्टायलिश लुक येईल हे यांच्यापेक्षा दुसरं कोणीच सांगू शकणार नाही..
कॉलेज बॅग असो की शूज अथवा टॅट्यू हे सगळं काही ट्रेंडी आहे..ही आहे नव्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी तरुणी ... हिवाळ्यात मेकअपसाठी कलर, आयलायनर, काजळ, हेअर कलर यांचा वापर या टीनएजर्सकडून सर्रास केला जातो..आणि या सगळ्या गोष्टींवर त्या आपल्या पॉकेटमनीमधून खर्च करतात...

मुलांप्रमाणेच या मुलीही शिक्षणापासून ते गॅझेटपर्यंत सगळ्यात बाबतीत मॉडर्न आहेत.त्या सतत स्वताला अपडेट ठेवतात...सोशल नेटवर्किंग साईट्स वरुन मुक्तपणे आपलं मत व्यक्त करत असतात.आणि हेच उद्याचं भविष्य आहे..
टीनएजर्सच्या संवादाची भाषाही आता पुर्ण हायटेक झालीय.. फेसबुक आणि ट्विटरवर शॉर्टकट मध्ये लिहीले जाणारे हे शब्द आता परवलीचे शब्द बनलेत.. त्यांचा एकच फंड़ा असतो.. कम्युनिकेशन हे फास्ट आणि क्लिअर असलं पाहिजे.. पण हे केवळ त्यांनाच कळते. कारण ती असते त्यानाच समजणारी भाषा..
टीन एज अर्थात बालवय...पण हे टीनएजर्स काही साधेसुधे नाहीत..त्यांची भाषा वेगळी आहे..त्यांचे ट्रेंड वेगळे आहेत..तसेच त्यांचा दृष्टीकोनही वेगळा आहे...त्यांचा विचार जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या मेसेजेवर नजर टाकावी लागेल.. आभ्यासात हे टीनएजर्स जराही मागे नाहीत..प्रत्येक परीक्षेत ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात...पण या पिढीने आपली खास अशी भाषा तयार केली आहे. नव्या पिढीने जणू हे नवविश्व तयार केलं आहे...हे विश्व तुमच्या आमच्यासाठी अनोखं असलं तरी टीनएजर्ससाठी ते ओळखीच आहे.
हेल्थ, फिटनेस, गॅझेटस केवळ यांनीच नाही तर सोशल नेटवर्किगं साईटसनी टिनएजर्सना सोशलाईट बनवलंय... आणि आज जर आपण मागील काही दिवसातल्या घटनांवर नजर टाकल्यास सामाजीक व्य़वस्थेविरुद्धच्या असंतोषला वाचा फोडण्यात टिनएजर्स आघाडीवर होते.
ही दृश्य आहेत २००८ मधली.. दिल्लीत कोवळ्या आरुषीच्या खूनानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींनी कँडलमार्च काढला होता..आरुषीला न्याय मिळावा म्हणून हे टीनएजर्स रस्त्यावर उतरले होते..डीपीएसच्या विद्यार्थ्यांनी कँडलमार्च काढल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले..ठिकठिकाणी कँडलमार्च काढण्यात आला..
नोव्हेंबर २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टीनएजर्स मोठ्याप्रमाणात रस्त्यावर आले...तारे -तारकांनीही हातात कँडल निषेध नोंदवला..
त्यानंतर रुचिरा गहरोत्रला न्याय मिळवून देण्यासाठीही मोठ्याप्रमाणात शाळकरी मुलांनी आंदोलन केलं..वर्षाच्या शेवटी दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडली तेव्हाही या नव्या पीढिने आपला सं