पासवर्ड श्रीमंतीचा- ८ ते १२ ऑक्टोबर

आर्थिक सुधारणांची पावलं उचलली असली तरी, क्रेडिट रेंटींग सुधारण्यास भारताला वाव असल्याचा, निष्कर्ष S&P या ग्लोबल क्रेडिंग एजन्सीनं नोंदवल्यामुळे, सरत्या आठवड्यात ;भारतीय शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2012, 10:53 PM IST

दिनेश पोतदार, www.24taas.com, मुंबई

शेअरबाजारातील चढ-उतार-
आर्थिक सुधारणांची पावलं उचलली असली तरी, क्रेडिट रेंटींग सुधारण्यास भारताला वाव असल्याचा, निष्कर्ष S&P या ग्लोबल क्रेडिंग एजन्सीनं नोंदवल्यामुळे, सरत्या आठवड्यात ;भारतीय शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं. भारताच्या आर्थिक वाढीविषयी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं, वर्तवलेल्या असमाधानकारक अंदाजाचाही;बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. आठवड्यातल्या पाच दिवसापैंकी, तीन दिवस बाजारात घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी ऑक्टोबरला ;युरो झोन कर्जचिंतेचा प्रभाव बाजारावर होता. सोमवारी तब्बल; 230 अंशांची घट दिसून आली. मंगळवारी, 9 ऑक्टोबरला मात्र बाजार 84 अंशांनी वधारला होता. नव्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागेल, असं अमेरिकेचे अर्थसचिवांनी सांगितल्यानंतर मंगळवारी बाजार वधारला होता. भारताला क्रेडिट रेटींगमध्ये सुधारण्यास अधिक वाव असल्याच एस एण्ड पीनं बुधवारी सांगितल्यानंतर बुधवारी ऑक्टोबरला बाजारात 162 अंशांची घट दिसून आली. मात्र, गुरुवारी,11 ऑक्टोबरलाबाजारानं पुन्हा उसळी घेतली. परदेशी फंडांनी भारतीय शेअर्सची खरेदी सुरुचं ठेवल्यामुळे गुरुवारी बाजार173अंशांनी वधारला होता. मात्र, शुक्रवारी12 ऑक्टोबरला बाजार पुन्हा घसरला. युरोपियन स्टॉक्स घसरल्यामुळे शुक्रवारी बाजार 130अंशांनी घसरला. या नंतर नजर टाकू याविविध सेक्टर्स आणि कंपन्यांच्या कामगिरीवर... आर्थिक सुधारणांची पावलं उचलली असली तरी, क्रेडिट रेंटींग सुधारण्यास भारताला वाव असल्याचा , निष्कर्ष ग्लोबल क्रेडिंग एजन्सीनं नोंदवल्यामुळे, सरत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं. भारताच्या आर्थिक वाढीविषयी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं, वर्तवलेल्या असमाधानकारक अंदाजाचाही बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. आठवड्यातल्या पाच दिवसापैंकी, तीन दिवस बाजारात घसरण पहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी 8 ऑक्टोबरला युरो झोन कर्जचिंतेचा प्रभाव बाजारावर होता. सोमवारी तब्बल 230 अंशांची घट दिसून आली. मंगळवारी, 9 ऑक्टोबरला मात्र बाजार 84 अंशांनी वधारला होता. नव्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमुळे भारताच्या आर्थिक विकासास हातभार लागेल, असं अमेरिकेचे अर्थसचिवांनी सांगितल्यानंतर मंगळवारी बाजार वधारला होता. भारताला क्रेडिट रेटींगमध्ये सुधारण्यास अधिक वाव असल्याच एस एण्ड पीनं बुधवारी सांगितल्यानंतर बुधवारी, 10 ऑक्टोबरला, बाजारात 162 अंशांची घट दिसून आली. मात्र, गुरुवारी, 11 ऑक्टोबरला बाजारानं पुन्हा उसळी घेतली. परदेशी फंडांनी भारतीय शेअर्सची खरेदी सुरुचं ठेवल्यामुळे गुरुवारी बाजार 173 अंशांनी वधारला होता. मात्र, शुक्रवारी 12 ऑक्टोबरला बाजार पुन्हा घसरला. युरोपियन स्टॉक्स घसरल्यामुळे शुक्रवारी बाजार 130 अंशांनी घसरला.
विविध सेक्टर्स व कंपन्यांची कामगिरी-
मुंबई शेअरबाजाराच्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी 4 सेक्टर्समध्येतेजी तर 9 सेक्टर्समध्ये मंदी होती. कन्झ्यमुर ड्युरेबल्स, FMCG, हेल्थ केअर आणि मेटल सेक्टर्स वधारले होते, तर ऑटो, बॅंका, कॅपिटल गुड्स, आयटी, ऑईल एण्ड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या रियॅलिटी हे सेक्टर्स घसरले होते. पहिल्यांदा नजर टाकू या आय.टी.सेक्टरवर...ताज्या तिमाही अहवालात, महसुल आणि मिळकतीबाबत घटीच्या शक्यता नोंदवल्यामुळे इन्फोसिसचे स्टॉक्स घसरले होते. विप्रो आणि टीसीएसच्या स्टॉक्समध्येही घट दिसून आली. वळू या बॅंकांच्या स्टॉक्सकडे..नफ्यात वाढ झाल्यामुळे HDFCबॅकेचे स्टॉक्स वधारले होते. तर होम लोनचे फ्लोटींग रेट कमी केल्यामुळेICICI बॅंके स्टॉक्सघसरले होते. एस एण्ड पीनंSBI चंक्रेडिट रेंटीगं उतरतअसल्याचा निष्कर्षनोंदवल्यामुळे SBI चे स्टॉक्स घसरले होते. चांगल्या परतीच्या पावसामुळे FMCGस्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आय़टीसीया प्रमुख FMCGकंपन्यांनी इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये उच्चांकांची नोंद केली. सरत्या आठवड्यात जवळजवळ सर्वच ऑटो स्टॉक्स घसरले होते. महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज आणि हिरो या प्रमुख ऑटो स्टॉक्समध्ये घट पहायला मिळाली. सेन्सेक्स पॅकच्या प्रमुख30 कंपन्यांपैकी 22स्टॉक्स घसरले होते, तर फक्त8स्टॉक्सवधारले होते. सेन्सेक्स पॅकच्या घसरणा-याकंपन्यांच्या यादीत भेलअव्वलस्थानी होती. सन फार्मा आणि टाटा स्टीलचे स्टॉक्स वधारले होते तर रिलायन्सचे स्टॉक्स घसरले होते. यानंतरसमजावून घेऊ या शेअर बाजारातील महत्त्वाची संकल्पना