लाईफ लाईनचं वास्तव!

कशी आहे मुंबईची लाईफ लाईन? लाखो प्रवाशांचा रोजचा संघर्ष! वर्षांनुवर्षं प्रशासन मात्र सुस्त!

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 12:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
रेल्वेच्या इतिहासात ठाणे रेल्वे स्थानकाचं वेगळ महत्व आहे...कारण देशातली पहिली रेल्वे ज्या दोन स्थानकांदरम्यान धावली त्यापैकी ठाणे एक आहे...रोज लाखो प्रवासी येथून प्रवास करत असले तरी प्रवाशांना मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागतो..आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी एक प्रवासी म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला..त्यांना जो अनुभव आला तो पहाता रेल्वे प्रवासी कोणत्या अवस्थेत प्रवास करत असतील हे तुमच्याही लक्षात येईल..
मायानगरी मुंबई....
या शहराची बातचं काही और आहे...देशाच्या कानाकोप-यातून रोज शेकडो लोक इथं येतात...ही चमचमती दुनिया प्रत्येकाला भूरळ घालते..सतत धावणा-या या शहराची लाईफ लाईन म्हणजे इथली लोकल ट्रेन...
रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात...या शहराला वेगवान ठेवण्यात लोकलची महत्वाची भूमिका आहे...भारतातील पहिली रेल्वे सीएसटी ते ठाणे या स्थानका दरम्यान धावली...ठाणे रेल्वे स्थानकात पहिल्यांदा रेल्वे आली त्याला आज जवळपास १६० वर्ष उलटून गेलीत...काळाच्या ओघात इथं बरचं काही बदललं पण य दरम्यान लोकलने प्रवास सुखकर होण्याऐवजी तो बिकट बनत गेला... रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्व असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनचं वास्तव आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत... आमच्या कॅमे-याने जे काही टीपलंय ते मोठं धक्कादायक आहे. लोकल प्रवाशांना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत...
१६ एप्रिल १८५३ भारतातील पहिली रेल्वे ज्या दोन स्थानका दरम्यान धावली त्यातील ठाणे हे एक रेल्वे स्थानक. रोज साडे सहा लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी कोणत्या सोईसुविधा आहे हे आता आपण पहाणार आहोत.
लोकलने प्रवास करायचं म्हटलं की तिकीट असणं आवश्यक आहे.
वेळ वाचवण्यासाठी आम्ही सीव्हीएम कुपन्सचा वापर करण्याचं ठरवलं..कुपन्स पंच करण्यासाठी आम्ही रेल्वे स्थानकातल्या सीव्हीएम मशिन जवळ गेलो...आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदीचा पहिला अनुभव आम्हाला आला.... रेल्वे स्थानकातील सीव्हीएम मशिन बंद असल्याचं आढळून आलं...ठाणे रेल्वे स्थानकात अनेक सीव्हीएम मशिन आहेत..त्यामुळे एखाद मशिन बंद असेल अस समजून आम्ही दुस-या मशिन जवळ पोहोचलो...पण तिथंही तोच अनुभव आला.. एखाद-दोन मशिन बंद असतील अस समजून आम्ही तिस-या मशिनकडं गेलो पण तिथही तोच अनुभव आला...आम्ही एकापाठोपाठ सर्व दहा सीव्हीएम मशिन बघीतल्या पण एकही मशिन चालू स्थितीत नव्हतं..
आमची ही धडपड एका रेल्वे कर्मचा-याच्या लक्षात आली आणि त्याने सीव्हीएम मशिन बंद असल्याचं इशा-याने सांगितलं...तसेच कुपनवर स्टँप मारण्याचा सल्ला दिला...पण तिथही हे चित्र होतं...कुपन्सवर स्टँप मारण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होता..प्रवासी घाईघाईत स्टँपमारत होते..पण घाईघाईत स्टँप मारतांना तारीख चुकल्यास विनातिकीट प्रवास केल्याबद्दल दंडाचा भूर्दंड प्रवाशीच्या माथी येण्याची शक्यता असते...पण इथलं हे चित्र काही एका दिवसापुरतं नव्हतं..गेल्या अनेक महिन्यापासून सीव्हीएम मशिन्स बंद असल्याचं नियमीतपणे प्रवास करणा-यांनी सांगितलं..
त्यानंतर आम्ही एटीव्हीएमचा पर्याय निवडला...तिकीटांसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी आम्ही एटीव्हीएमच्या माध्यमातून तिकीट काढण्याचं ठरवलं...खरं तर रेल्वेनेही एटीव्हीएमचा मोठा गाजावाजा केला...पण रेल्वेची ही योजनाही प्रवाशांच्या किती कामी य़ेते हे तुमच्या लक्षात येईल..सीव्हीएम प्रमाणेच एटीव्हीएमच्या मशिनचीही अवस्था असल्याचं पहायला मिळालं...जे मशिन्स सुरु होते तिथं रेल्वे कर्मचारी प्रवाशांना तिकीट काढून देण्याचं काम करत होते..आम्ही एटीव्हीएम मशिनमधून तिकीट काढण्यासाठी गेले पण तिथंही रंगेनं आमचा पिच्छा काही सोडला नाही..त्यामुळे आम्ही तिकीट खिडकीचा मार्ग निवडला..तिकीट खिडकीवर भल्या मोठ्या रांगेनं आमचं स्वागत केलं..त्यामुळे आम्ही फूट ओव्हर ब्रीजवर असलेल्या एटीव्हीएम मशिनजवळ गेलो..पण ते मशिनही बंद अवस्थेत आढळून आलं..बंद असलेलं मशिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर्मचा-यांकडून केला जातं होतं..त्यामुळं आम्ही तिकीट खिडकीवरुन तिकीट घेण्याचा निर्णय घेतला...आम्ही तिकीटाच्या रांगेत उभे राहिलो..खरं तर ती गर्दीची वेळ नव्हती...पण तरीही तिकीट काढण्यासाठी आम्हाला १५ मिनिटं लागली...
ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी तिकीटापासून ते एटीव्हीएम मशिन्सची सुविधा असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो खरा पण त्याचं वास्तव आताच तु