महागाईचे चटके, सांगा कसं जगायचं?

देशभरात महागाईचा वणवा हळूहळू पेट घेत असताना त्यात आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढत चालल्यायत. खाद्यतेलाच्या भडकत जाणा-या किमती हे नवं सकंट मानल जातय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची वाढलेली मागणी, अपुरा पुरवठा आणि त्यातच रुपयाचं घसरतं जाणारं स्थान यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखीन भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Updated: Apr 4, 2012, 11:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई ही आता अर्थतज्ञांचीच नाहीतर सर्वसामान्यांच बजेट कोलमडवणारी ठरलीय. खाद्यतेल असो कि पेट्रोलचे दर, बेस्टचा प्रवास असो वा हॉटेलींग... सगळ्याच गोष्टींचे दर महागलेयत.. सर्वसामान्याना आता दररोजचा खर्च करताना महिन्याचे नियोजन करणंही अवघड होऊन बसलय.. यावर आता सर्वसामान्य विचारतोय केवळ एकच सवाल.. सांगा कसं जगायचं?

 

 

देशाच्या नामवंत अर्थशास्त्रज्ञापासून ते एखाद्या मध्यमवर्गीय माणसापर्यंत सर्वानाच हा प्रश्न सतावतोय.. सांगा कसं जगायच.. दैनदिन जिवनातल्या असो वा खाण्याचे पदार्थ असो.. सर्वानांच सर्वच क्षेत्रातल्या महागाईचा सामना करावा लागतोय. केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधल्या वाढीव करांच्या अमंलबजावणीन आता महागाईचा भडका जास्तच पेटणार आहे.

 

 

कशी आवरायची महागाई ? हतबल सरकार, जनता बेजार !

 

 

महागाईच दूखण आज प्रत्येक सर्वसामान्याला सतावतेय. देशाच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ही दूसरी टर्म  आहे. अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असणारे मनमोहन सिंग यानी देशाचा आर्थिक डोलारा सांभाळलाय का या प्रश्नांचे उत्तर शोधताना कदाचित आकडेमोड करावी लागेल पण देशात वाढलेला महागाईचा आलेख गेल्या काही दिवसात तक्ता मोडून नियंत्रणरेषेबाहेर चाललाय हि वस्तुस्थिती आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल असो वा  नियोजन आयोगाचा अहवाल असो या सा-यातून केवळ कागदावरचे आकडे छान मांडले गेलेयत.. पण प्रत्यक्षात मात्र खिसा आणि घरच किचनचं बजेट मात्र केव्हाच कोलमडून प़डल आहे.

 

 

प्रणवदांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि सर्वसामान्यांना दिलासा तर नाहीच मिळाला, मिळाला तो केवळ महागाईचा धक्का.. राज्याच्या अर्थसंकल्पातही अजित पवारानी सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावण्याचंच काम केलय. गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यालाचा सहन करावा  लागतोय.. बेस्ट आणि ट्रेनच्या तिकीटापासून ते थेट 12 टक्के वाढलेल्या सर्व्हीस टॅक्सचे छुपे पडसाद आता दिसू लागले आहेत.

 

दूध                          48 रुपये

गॅस सिलींडर              412

रॉकेल                 15

पेट्रोल                 74.56

डिझेल                45.28

 

 

ही केवळ थेट किचनवर परिणाम करणा-या वस्तूची उदाहरण आहेत.. पण सर्वच क्षेत्रात आज महागाई वाढत चाललीय. किचनचं बजेटचं नाही तर आज नेमक स्वस्तात राहीलय काय अस विचारण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय. पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दरामुळे वाहतूकीवर परिणाम आणि त्याचा परिणाम थेट मंडईत अस चित्र पहायला मिळतय.. भाजीपाल्याच्या किमतीवर परिणाम झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता भाजी घेतानाही विचार करावा लागत आहे.
वस्तू                           दर(प्रती किलो)

कोथिंबीर जुडी                   25 ते 30

भेंडी                             72 ते 80

फरसबी                          60 ते 80

गवार                            80 ते 100

घेव़डा                            40 ते 60

कारली                            48 ते 60

कोबी                              25 ते 30

ढोबळी मिरची                    40 ते 50

टॉमेटो