आयसीसीला लागली होती फिक्सिंगची भनक

विंदू दारासिंग आणि मयप्पन यांच्या बटेंगची माहिती आयसीसीला अगोदरपासूनच होती, अशी धक्कादायक माहिती क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 31, 2013, 06:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विंदू दारासिंग आणि मयप्पन यांच्या बटेंगची माहिती आयसीसीला अगोदरपासूनच होती, अशी धक्कादायक माहिती क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालीय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या जावई गुरुनाथ मय्यपन आणि बुकीजमधील संबंधांबद्दल बीसीसीआय बोर्डाला अगोदरच इशारा दिला होता. याबाबत मयप्पनने विंदूला बजावले होते, अशीही माहिती समोर येतेय. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने मयप्पनला ताकीद दिल्याची माहिती मयप्पनने विंदूला दिली होती. बेटिंगबाबत आयसीसीचं लक्ष आहे, असं मयप्पननं एप्रिलमध्ये विंदूला बजावलं होतं.

मयप्पनला आयपील-६मधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसी भ्रष्टाचार विरोधी ब्युरोनं गुरुनाथ मयप्पन आणि बुकीज यांच्यातील व्यवहारांबद्दल माहिती दिली होती... तेही आयपीएल सीझन-सहा सुरू होण्यापूर्वीच...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.