www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
विंदू दारासिंह याला अटक झाल्यानंतर चर्चेत आलेली साक्षी धोनी ही आयपीएल फिक्सिंगच्या गुंत्यात आणखी गुंतत चाललीय. आता, बुकी जीजू जनार्दन सोबतचीही तिची जवळीक समोर आलीय.
आयपीएल फिक्सिंग प्रकरणात बुकी जीजू जनार्दन याला याअगोदरच अटक करण्यात आलीय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीनं यापूर्वी जीजू जनार्दनसोबत पार्ट्यांनाही हजेरी लावलीय. श्रीसंतच्या मैत्रिणीच्या घरी झालेल्या एका पार्टीत तो जीजू जनार्दन आणि साक्षीबरोबर गेला होता. साक्षीच्या फर्माइशवर त्या पार्टीत स्पेशल नॉनव्हेज जेवणही बनवण्याक आले होतं.
मॅच संपल्यानंतर राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाकडून खेळाडूंसाठी पार्टी आयोजित केली जाते. या पार्टीनंतर हॉटेलमध्ये श्रीसंत आपली प्रायव्हेयट पार्टी करीत असत. यामध्येी श्रीसंत, बुकी अभिषेक शुक्लात, आणि जीजू आपल्याल मैत्रिणी तसेच त्याच्या परिचित मुलींबरोबर या पार्टीमध्ये सहभागी होत असत.
बुकी अभिषेक शुक्लाचा जयपूर येथील एका प्रसिद्ध ज्वेलरशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरमधील अनेक प्रसिद्ध व्यक्ती फिक्सिंगमध्यें सहभागी असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. शुक्लाचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी जवाहर सर्कलजवळील एका हॉटेलमधून श्रीसंतविरोधातील दस्तऐवज जमा केले आहेत. हॉटेलच्या गॅलरी आणि बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांच्या हाती आलंय.
बुकी अभिषेक जयपूरमधील श्रीसंतच्या पार्टीचा खर्च करीत असत. दीड महिन्यापूर्वीच्या श्रीशांतच्या पार्टीचे सुमारे १५ लाख रूपयेही अभिषेकने दिले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल दरम्यान अभिषेक शुक्ला आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या जीजू जनार्दन यांनी दीड महिन्यापूर्वीच रूम बुक केली होती. टीम हॉटेलच्या सातव्या मजल्याजवर तर हे दोघे सहाव्या मजल्यावर उतरले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.