ऑडिट मतदारसंघाचं : उत्तर मुंबई

ऑडिट मतदारसंघाचं - उत्तर मुंबई

Updated: Apr 4, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उत्तर मुंबई
नेता विरूद्ध अभिनेता अशी काँटे की लढत 2004 साली या मतदारसंघात झाली... काँग्रेसचा उमेदवार असलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्याने पाचवेळा खासदार असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला पराभवाची धूळ चारली... पण लोकांची ही निवड साफ चुकली... कारण खासदार झालेला हा अभिनेता पाच वर्षांत मतदारसंघात फिरकलाच नाही. खासदार दाखवा आणि बक्षिस मिळवा... असा प्रचार मग रंगला होता...  हा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई
             उत्तर मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचं उत्तरेकडील प्रवेशद्वार... दहिसर इथून या मतदारसंघाला सुरुवात होते. मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासियांचे वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात आपल्याला आदिवासी बांधवांचे अस्तित्वही पहायला मिळते. मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळ असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क याच मतदारसंघात आहे. याच नॅशनल पार्कमध्ये मुंबईपासून हाकेच्या अंतरावर पण सुविधांपासून कोसो दूर असलेले आदिवासी पाडे पहायला मिळतात. मूलभूत सुविधांपासून दूर असलेला हा आदिवासी अशिक्षित असल्याने आपल्या हक्कासाठी आवाज उठवतानाही दिसत नाही.गेल्या काही वर्षात उत्तर मुंबईचा चेहरामोहरा बदललाय.  मोकळ्या जागेवर उंचचउंच इमारती उभ्या राहिल्यात. चारकोप-गोराई या म्हाडाच्या वसाहतींबरोबरच आता नव्याने म्हाडाच्या इमारती उभ्या राहत आहेत. 
 उत्तर मुंबई मतदारसंघातील सुमारे 16 लाख 8 हजार 924 मतदारांपैकी पुरुष मतदार 8 लाख 78 हजार 801 तर महिला मतदार 7 लाख 30 हजार 123  आहेत.
उत्तर मुंबईतून यापूर्वी व्ही. के. कृष्णन मेनन, पाणीवाल्याबाई  मृणाल गोरे यांच्यासारखे दिग्गज खासदार लोकसभेवर निवडून गेलेत.
1951 मध्ये विठ्ठल बाळकृष्ण  गांधी काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम या मतदारसंघातून निवडून आलेत... 1957 आणि  1962 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे माजी राजदूत व्ही के कृष्णन मेनन यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्याने इथे प्रतिनिधीत्व केले... 1977 मृणाल गोरे भारतीय लोकदलाच्या तिकीटावर निवडून आल्या. 1980 मध्ये  जनता पार्टीचे रविंद्र वर्मा विजयी झाले तर 1984 मध्ये काँग्रेसचे अनुपचंद शाह उत्तर मुंबईतून निवडून आले.
त्यानंतर मात्र 1989, 1991, 1996, 1998, 1999 असे सलग पाच वेळा उत्तर मुंबईतून भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक विजयी झाले होते. 2004 साली काँग्रेसने सिने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी देऊन भाजपाच्या या `रामा`ला वनवासात पाठवलं. पण सिनेमातल्या गोविंदाचा राजकारणात फारसा जीव रमला नाही.  2009 मध्ये काँग्रेसने गोविंदाऐवजी उत्तर मुंबईतील रहिवाशी नसलेल्या संजय निरुपम यांना तिकीट दिलं. त्यांनीही राम नाईक यांना पराभवाची धूळ चारत लोकसभेत प्रवेश केला..
उत्तर मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी
बोरीवली आणि चारकोप हे दोन मतदारसंघ भाजपाकडे,
कांदिवली आणि मालाड हे मतदारसंघ काँग्रेसकडे तर शिवसेनेकडे दहिसर आणि मनसेकडे मागाठाणे असे एक-एक मतदारसंघ आहेत.
 
बोरीवली – गोपाळ शेट्टी, भाजप
चारकोप – योगेश सागर, भाजप
कांदिवली (पूर्व) – रमेशसिंग ठाकूर, काँग्रेस
मालाड – अस्लम शेख, काँग्रेस
दहिसर – विनोद घोसाळकर, शिवसेना
मागाठाणे – प्रविण दरेकर, मनसे)
2004 आणि 2009 नंतर आता 2014 मध्ये विजय मिळवून काँग्रेस उत्तर मुंबईमधून हॅट्रीक करणार का याबाबत उत्सुकता आहे. मराठी मतांची विभागणी हा फॅक्टर मागील निवडणुकीत निर्णायक ठरला होता. या निवडणुकीत पुन्हा तेच चित्र पहायला मिळतं की भाजपा आपली पराभवाची मालिका खंडित करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
 
खासदार संजय निरूपम यांची ओळख
राम नाईक या मतदारसंघाचे खासदार असताना जनसंपर्कासाठी ते रेल्वेतून प्रवास करायचे... विविध रेल्वे स्थानकांवर बुटपॉलिश करणारे आपली एका दिवसाची कमाई राम नाईकांना निवडणुकीसाठी मदत म्हणून द्यायचे... आता त्याच उत्तर मुंबईचे खासदार आहेत संजय निरूपम... त्यांची ओळख करून घेऊया....
 
नाव – संजय निरुपम
जन्म – 6 फेब्रुवारी 1965
वय –   48
शिक्षण – बीए
काँग्रेसचे संजय निरुपम हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतायत. मूळचे पत्रकार असलेले संजय निरुपम हे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या हिंदी सामनाचे संपादक होते. शिवसेनेनं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आणि निरुपम यांचा ख-या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला. निरुपम यांनी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र काँ