www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
विलास मुत्तेमवार यांच्या कार्यालयात रोख रक्कम असण्याच्या शक्यतेमुळे ही कारवाई करण्यात आलीय. मुत्तेमवार हे नागपुरात काँग्रेसचे उमेदवार असून विद्यमान खासदार आहेत.
तर दुसरीकडे सांगली जिह्यातल्या जत-सातारा रोडवर एका कारमधून साडेसहा लाख रुपयांची रोकड सापडलीय. या कारमधून काँग्रेसचं प्रचार साहित्य जप्त करण्यात आलंय. निवडणुकीसाठी पैसे वाटप करण्यासाठी अज्ञात वाहन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईतसाडेसहा लाखांची रोकड आणि काँग्रेसचं प्रचार साहित्य जप्त केलंय. संजीव पट्टनशेट्टी याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेट्टी काँग्रेस कार्यकर्त्ता असल्याची माहिती समोर येतेय.
पट्टनशेट्टी हा एका पेट्रोल पंपाचा मालक आहे. मात्र अचारसहिंता असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पट्टनशेट्टीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितल आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.