www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याचे संकेत आहेत.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासोबतच मंत्रिमंडळात आणि पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. त्यादृष्टीने दिल्लीत चर्चेचा सिलसिला सुरू आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसची कामगिरी सुधारण्यासाठी महाराष्ट्रात `कामराज योजना` लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
त्यानुसार काही बुजूर्ग, ज्येष्ठ मंत्र्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कार्यक्षम आमदारांना आणि आपल्या जिल्ह्यात ताकद देऊ शकणा-या आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असून, प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक चेहरा देण्याचा विचार काँग्रेस श्रेष्ठी करत आहेत.
काय आहे काँग्रेसची कामराज योजना?
1960 च्या दशकात काँग्रेसला बळ देण्यासाठी राबवली `कामराज योजना`
काँग्रेस नेते कामराज यांच्या योजनेनुसार काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल
अर्धा डझन ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्ष संघटनेला वाहून घेतले
लालबहादूर शास्त्री, जगजीवन राम, मोरारजी, एस. के. पाटलांचे राजीनामे
काँग्रेस मजबुतीसाठी अनेक मुख्यमंत्र्यांनीही दिले राजीनामे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.