निवडणुकीची रणधुमाळी: लक्ष्मण जगतापांचा `वासुदेव` प्रचार!

निवडणूक प्रचारात अनोखे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहचण्याची शक्कल उमेदवार लढवतात. असाच एक प्रयोग मावळ लोकसभेचे शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सुरु केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 7, 2014, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
निवडणूक प्रचारात अनोखे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहचण्याची शक्कल उमेदवार लढवतात. असाच एक प्रयोग मावळ लोकसभेचे शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सुरु केलाय.
सूर्योदयाच्या वेळी लोकांना झोपेतून उठवणारे आणि भिक्षा मागणारे हे वासूदेव पिंपरी-चिंचवडकरांना सध्या झोपेतून जागे करत आहेत. त्याला कारणही तसंच आहे, शेकाप आघाडीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी या वासुदेवांना प्रचारासाठी मैदानात उतरवलंय. एरवी भूपाळी आणि देवाची गाणी गाणारे हे वासूदेव आता लक्ष्मण जगताप यांची गाणी गात आहेत. वासुदेवांना प्रचारात उतरवण्याचा हा जगतापांचा फंडा सध्या मतदारसंघात सगळीकडे लक्ष वेधून घेतोय.
निवडणुकीच्या रणांगणात प्रचारासाठी लढवलेली ही शक्कल जगताप यांना खासदारकीच्या खुर्चीवर बसवण्यास उपयुक्त ठरली की नाही ? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x