www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`आम आदमी पक्षा`चे नेते आणि संयोजक तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता उघडपणे सरळ सरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर `लेटर` बॉम्ब टाकलाय.
अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी यांना एक चिठ्ठी लिहिलीय. या चिठ्ठीची एक कॉपी झी मीडियाकडेही उपलब्ध आहे. या चिठ्ठीत केजरीवाल यांनी राहुल गांधी यांना चार प्रश्न विचारलेत.
पहिला प्रश्न : मुकेश अंबानी आणि तुमचे किंवा काँग्रेस यांमध्ये काय संबंध आहे?
दुसरा प्रश्न - मुकेश अंबानी यांना ८ डॉलर प्रति युनिट गॅसचं तुम्ही समर्थन करता का?
तिसरा प्रश्न - तुमच्या निवडणूक प्रचारावर नेमका किती पैसा खर्च होतोय आणि हे पैसे कुठून येतात?
चौथा प्रश्न मोईली, खर्शीद, कमलनाथ, चिदंबरम यांना तुमच्याकडून लोकसभा तिकीट मिळणार का?
महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपू्र्वीच केजरीवाल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. यामध्ये, गॅसची किंमत वाढण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काय कराल? देशात काळं धन परत कसं येईल? पक्ष भ्रष्टाचार कसा दूर करेल? भाजपचा निवडणूक खर्च आणि पक्षाच्या निवडणूक अभियानाला कोण फंडींग करतंय? असे काही बोचरे प्रश्न त्यांनी मोदींना करून ही माहिती सार्वजनिक करण्याचं आवाहन केलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.