गुल पनागला उमेदवारी, `आप` कार्यकर्ते नाराज

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पार्टीच्या तिकीटावर चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गुल पनाग हिची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक जण नाराज आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 13, 2014, 08:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पार्टीच्या तिकीटावर चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गुल पनाग हिची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक जण नाराज आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना डावल्याने गुलसमोर आव्हान उभे आहे.
आपल्याला जनतेची सेवा करायची आहे आणि त्यासाठी राजकारण हे योग्य आणि आवडतं माध्यम असल्याचं गुल पनागनं आपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितलं. गुल पनागनं आपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केल्यानंतर लगेचच तिला चंदीगडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यानिमित्तानं मात्र आपमध्ये नाराजी पसरलीय. आपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या लोकांना आपमधून तिकीट दिली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.