लोकसभा निवडणूक : राज्यात महायुतीचा 'झेंडा', राणे-भुजबळ पराभूत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2014, 05:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज चांगलाच रंगला. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...
सायंकाळी ६.३० वाजता अपडेट
Ø रामटेक कृपाल तुमाने १ लाख ७५ हजार ७९ मतांनी विजयी
Ø नागपूर नितीन गडकरी २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी विजयी
Ø चंद्रपूर २ लाख ३६ हजार २६९ मतांनी विजयी
Ø गडचिरोली भाजपचे अशोक नेते २ लाख ३६ हजार ५४० मतांनी विजयी

सायंकाळी ६.०० वाजता अपडेट
Ø १२ व्या फेरीपर्यंत २ लाख ६ हजार ४१६ मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
Ø नागपूर - १६ फेरीनंतर गडकरी २ लाख ८२ हजार १२४ मतांनी आघाडीवर
Ø चंद्रपूर - हंसराज अहिर २४व्या फेरीनंतर २ लाख ३३ हजार ८५८ मतांनी आघाडीवर
Ø पालघर भाजपचे चिंतामण वनगा विजयी.... बळीराम जाधव यांच्यावर मात
Ø हिंगोली राजीव सातव अवघ्या १६३२ मतांनी विजयी... महायुतीच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव
सायंकाळी ५.३० वाजता अपडेट
Ø चंद्रपूर - २३व्या फेरीनंतर हंसराज अहिर २,२८,१३६ मतांनी आघाडीवर
Ø नागपूर - नितीन गडकरी २ लाख ३३ हजार ८०० मतांनी आघाडीवर
Ø रामटेक - सोळाव्या फेरीनंतर कृपाल तुमाने १ लाख ४५ हजार १०८ मतांनी आघाडीवर
Ø शिर्डी - पंधराव्या फेरीनंतर सदाशिव लोखंडे ४,१६,३४० मतं तर भाऊसाहेब वाकचौरेंना २,६५,१२५ मतं
Ø ठाणे राजन विचारे २ लाख ८० हजार ९४४ मतांनी विजयी
Ø रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे विनायक राऊत यांचा १ लाख ५० हजार ५१ मतांनी विजय... निलेश राणेंचा केला पराभव

सायंकाळी ५.०० वाजता अपडेट
Ø पुणे अनिल शिरोळे ३ लाख १४ हजार ८७० मतांनी विजयी... विश्वजीत कदम यांना पछाडलं
Ø अहमदनगर भाजपचे दिलीप गांधी २ लाख ८ हजार ४०७ मतांनी विजयी
Ø चंद्रपूर हंसराज अहिर २ लाख ५ हजार ६ मतांनी आघाडीवर
Ø परभणी शिवसेनेचे संजय जाधव १ लाख २७ हजार १५५ मतांनी विजयी
Ø भंडारा-गोंदिया भाजपचे नाना पटोले विजयी, प्रफुल्ल पटेल यांचा पराभव 1,49, 722
Ø वर्धा रामदास तडस २,१५,७८३ मतांनी विजयी

दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø रायगड शिवसेनेचे अनंत गीते यांना विजयी केलं घोषित... सुनील तटकरेंना पराभव मान्य
Ø जालना भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे २ लाख १४ हजार मतांनी विजयी... काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पराभूत
Ø कोल्हापूर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी... मडाडिक यांना एकूण ६,७६,६६५ मतं तर सेनेच्या संजय मंडलिक यांना ५,७४,४०६ मतं...
Ø सोलापूर शरद बनसोडे विजयी... सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा जबर धक्का
Ø शिरुर शिवाजी आढळराव विजयी... देवदत्त निकम पराभूत
Ø औरंगाबाद चंद्रकांत खैरे १ लाख २५ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी... सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा पटकावला बहुमान
Ø मावळ श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांजी विजयी... जगताप यांनी ३,५४८२९ मतं, तर नार्वेकरांना १,८२,२९३ मतं
Ø माढा माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील २९,००० मतांनी विजयी
Ø अकोला संजय धोत्रे २ लाख ४ हजार ११६ मतांनी विजयी
Ø नांदेड काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना ८०,८३८ मतांचं मताधिक्य... भाजपच्या डी बी पाटील यांचा पराभव

दुपारी ३.०० वाजता अपडेट
Ø सांगली - भाजपचे संजय काका पाटील २ लाख ३८ हजार ९३२ मतांनी विजयी... सांगलीतल्या आत्तापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीतलं मताधिक्य तोडलं
Ø मुंबई उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर विजयी
Ø उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन विजयी
Ø दक्षिण मुंबई - शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
Ø बारामती - सुप्रीया सुळे यांचा ७०,००० मतांनी विजय
Ø दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे यांची निर्णायक आघाडी, ४२,९५५ मतांची घेतली आघाडी
Ø उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी विजयी, खासदार संजय निरुपम यांचा केला पराभव