सेना-काँग्रेसचे कुकुटपालन- राज ठाकरे

राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेत निवडणुकीच्या निमित्ताने साटंलोट असल्याचं आपल्या भाषणात सूचित केलं. ते ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेंट्रल मैदानातील जाहीर सभेत बोलत होते.

Updated: Feb 10, 2012, 10:09 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेत निवडणुकीच्या निमित्ताने साटंलोट असल्याचं आपल्या भाषणात सूचित केलं. ते ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेंट्रल मैदानातील जाहीर सभेत बोलत होते.

 

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीनंतर सेनाप्रमुख निष्प्रभ होतील अशी टीका आताच का केली? असा सवाल करात याआधी कधी मुख्यमंत्र्यांनी सेनाप्रमुखांवर टीका केली नव्हती याकडे लक्ष वेधलं. ते पुढे म्हणाले की राजकारणाच्या अंगाने तिरकस अर्थ काढायचा तर काँग्रेस आणि सेनेत आतून काहीतरी साटंलोटं असल्याच्या शंकेला वाव आहे.

 

राज ठाकरे म्हणाले की सेनाप्रमुखांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यामुळे शिवसैनिक उसळून परत नव्या जोमाने निवडणुकीत उतरतील आणि त्याचा फायदा सेनेला मुबई-ठाणे महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. काँग्रेसला इतर महापालिकांमध्ये मोकळं रान त्यामुळे मिळू शकते. हे सर्व कुकुटपालन आहे. तुम्ही मुंबई-ठाण्याच्या कोंबड्या सांभाळा इतत्र आम्ही पाळतो.

 

राज ठाकरेंनी या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या तूफान टीका केली.

Tags: