राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 25, 2014, 09:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी/सिंधुदुर्ग
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
तसंच काँग्रेसचे डॉ. निलेश राणे दुपारी १ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. मात्र सिंधुदुर्गचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील की नाही याबाबत मात्र अद्यापही शंका आहे. कारण सिंधुदुर्गात राष्ट्रवादीनं असहकारीची भूमिका घेतल्यानंतर नारायण राणेंनी तो त्यांचा पक्षांतर्गतचा मुद्दा आहे.
मात्र, महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी याचे पडसाद उमटले तर स्थिती काय होईल असा सवाल उपस्थित करत. राष्ट्रवादीला गर्भित इशाराच दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.