सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Updated: May 16, 2014, 04:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
राजकारणात हार जीत होत असते, लोकांचा जनादेश आमच्या विरोधात आहे, आम्ही लोकांचा जनादेश आदराने स्वीकारतो, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
मी नव्या सरकारचं अभिनंदन करते, आम्हाला जो पाठिंबा मिळाला आहे, त्याविषयी मी कार्यकर्त्यांचे आभार मानते, असंही सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितलं.
आमच्या काँग्रेस पक्षाचा जो सिद्धात आहे, त्यावर आम्ही कायम आहोत, यात आम्ही कोणताही समझोता करणार नसल्याचंही सोनियांनी स्पष्ट केलं आहे.
राहुल गांधींनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली
राहुल गांधी फक्त मोजक्या तीन - चार वाक्यात बोलले, मी नवीन सरकारचं अभिनंदन करतो, काँग्रेस उपाध्यक्ष या नात्याने पराभवाची जबाबदारी माझी आहे ती मी स्वीकारतो.