पाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: May 12, 2014, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
मात्र टाईम्स नाऊने बिहारमध्ये भाजपला 28 जागा मिळणार असल्याचं म्हटलं, यानंतर जेडीयू दहा, तर काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागणार आहे, लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला भोपळा मिळणार असल्याचं टाईम्स नाऊवरील अंदाजांवरून सांगण्यात आलंय.
----------------------
बिहार एबीपी - नील्सन सर्वे
---------------------------
बिहारच्या एकूण 40 जागा
भाजप 19
एलजेपी 02
आरजेडी 10
जेडीयू 05
काँग्रेस 04
--------------
बिहार टाईम्स नाऊचा एक्झिट पोल
---------------------------
काँग्रेस 02
भाजप 28
जेडीयू 10
आरजेडी 00
--------------------

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.