मेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?

`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 16, 2014, 10:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`आम आदमी पार्टी`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत... तेही `आप`च्या तिकीटावर... उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून मेधा पाटकर राजकारणाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकणार असल्याचं समजतंय.
ईशान्य मुंबई मतदारसंघात एकूण १५ लाख ७२ हजार ८९० मतदार आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा केवळ २९३३ मतांनी विजय झाला होता. यात राष्ट्रवादीला २ लाख १३,५०५ मत मिळाली होती तर भाजपच्या किरीट सोमय्यांना २ लाख १० हजार ५७२ मतं मिळाली होती. मनसेच्या शिशिर शिंदेंनीही तब्बल १ लाख ९५ मतं मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
मात्र, यावेळी आपच्या मेधा पाटकर या मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्यानं या मतादारसंघाची राजकीय समीकरणंच बदलणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं पाटकरांमुळं होणाऱ्या मतविभाजनाचा नक्की कुणाला फायदा होणार? याची उत्सुकता आत्तापासूनच निर्माण झालीय.

व्हिडिओ पाहा - पाहा, काय म्हणतायत मेधा पाटकर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.