गेस्ट ब्लॉग : रेणुका आर्ट्स खुले ई-साहित्य संमेलन (द्वितीय)

मागील वर्षी २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित 'रेणुका आर्ट्स खुले ई साहित्य संमेलन' सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या इतिहासातील 'प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन' होते.

Updated: Feb 20, 2015, 10:29 PM IST
गेस्ट ब्लॉग : रेणुका आर्ट्स खुले ई-साहित्य संमेलन (द्वितीय) title=

आसावरी इंगळे : मागील वर्षी २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित 'रेणुका आर्ट्स खुले ई साहित्य संमेलन' सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या इतिहासातील 'प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन' होते. हे संमेलन अतिशय खेळीमेळीत यशस्वीरित्या पार पडले. त्याची दखल अनेक वृत्तपत्र, तसेच‘जय महाराष्ट्र’ या न्यूज चानलने देखील घेतली. गेल्या वर्षभरात अनेकांनी हे संमेलन पुन्हा केव्हा होणार याची विचारणा करून संमेलनात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. सर्वांच्या इच्छेला मान देऊन यावर्षीही हे संमेलन १ ते १४ फेब्रुवारी या दरम्यान हे संमेलन संपन्न झाले.

वाचकांचे अभिप्राय, मग ते कौतुक असो वा टीका या लेखकाला अतिशय गरजेच्या असतात, यात काहीच दुमत नाही. त्यातूनच त्याला पुढील लिखाणाला बळ मिळते, लेखन शैली फुलत जाते, समृध्द होत जाते. आपली पोस्ट वाचली जात नाही, हे कोणत्याही लेखक / कवीकरीता क्लेश देणारे सत्य आहे. याला एक पर्याय म्हणून, इंग्रजी भाषेपुढे मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तसेच साहित्य संमेलनात होणारे गलिच्छ राजकारण पाहून, त्यात खऱ्या साहित्यिकांची होणारी घुसमट पाहून आसावरी इंगळे यांना ऑनलाइन साहित्य संमेलनाची कल्पना सुचली. ती मागील वर्षी अंमलातही आणली. त्याला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. 

मागील वर्षी २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित रेणुका आर्ट्स खुले ई साहित्य संमेलन' संमेलन सोशल नेट्वर्किंग साईट्सच्या इतिहासातील 'प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन' ठरले. हे संमेलन अतिशय खेळीमेळीत यशस्वीरित्या पार पडले व त्याची दखल अनेक वृत्तपत्र, तसेच‘जय महाराष्ट्र’ या न्यूज चानलने देखील घेतली. गेल्या वर्षभरात अनेकांनी हे संमेलन पुन्हा केव्हा होणार याची विचारणा करून संमेलनात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली, विनंती केली. त्यांच्या इच्छेला मान देऊन आसावरी यांनी यावर्षीही १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन साहित्य संमेलन सुरु केले.

संमेलनात संपूर्ण भर हा केवळ मराठी भाषा व साहित्यावर देण्यात आला होता. साहित्याचा निर्भेळ आनंद घेता यावा याकरिता संमेलनात राजकारण, जातपात, वर्णभेद तसेच अश्लीलता पूर्णपणे वर्ज्य केले गेले. यातील कथामाला, चारोळ्या, चर्चासत्र, परिसंवाद, नाट्यप्रसंग लिहून पाहणे, कवितेचे किंवा गीताचे रसग्रहण करणे, सारखे उपक्रम लेखक व कवींच्या लेखनाचा कस लावणारे होते. 'एका ओळीवरून कविता' करणे, 'कवितेचे किंवा गीताचे रसग्रहण' करणे सारखे उपक्रम कवींना आव्हान होते. 'पुस्तक परिचय', 'कविसंमेलन' या उपक्रमांनी उपलब्ध पुस्तकांबद्दल माहितीत मोलाची भर पडावी, कवितांची उजळणी व्हावी, काही कविता नव्याने कळाव्या, हे उद्देश होते. समृध्द मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, या हेतूने 'माय मराठीचे जतन' हा उपक्रम नव्याने सामील केला होता. 'मनोरंजन' या नव्याने सुरु केलेल्या उपक्रमात आपल्या बालपणीची अविस्मरणीय आठवण पोस्ट करायची होती. 'बोचरे शल्य' या उपक्रमात मनात सलत असलेले शल्य लिहायचे होते. उद्देश हाच की यानिमित्ताने प्रत्येकाने लिहून पाहावे व सर्वांनी आपल्या चिंता काही काळ दूर ठेऊन पुन्हा हरवलेले बालपण जगावे.

संमेलनात प्रत्येक उपक्रमाकरिता स्वतंत्र डॉक बनवण्यात आले होते. आलेल्या पोस्ट्सची समीक्षा करायला जाणकार समीक्षक तर होतेच शिवाय संपादकीय नजरेतून सहभागी सदस्यांना प्रोत्साहन देण्याकरिता पत्रकारिता व मिडिया क्षेत्रातील अनुभवी पत्रकार / संपादक यांनी  उपक्रम अतिथी या नात्याने त्यांचे विचार मांडले. आपल्याला सर्व प्रकारचे लेखन हाताळून पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी व ते विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभावे, विचारांचे आदानप्रदान व्हावे, लेखन शैलीला अजून धार यावी, ज्ञानरंजनासोबतच मनोरंजनही व्हावे हे संमेलनाचे उद्दिष्ट होते. आपल्या दैनंदिनीतून वेळात वेळ काढून संमेलनात सहभागी होता यावे, याकरिता प्रत्येक उपक्रमाला एक पूर्ण दिवस देण्यात आला होता. या संमेलनाच्या निमित्ताने सोशल मिडीयाच्या आभासी जगातील लेखक-वाचक, कलाकार-रसिक, जाहिरातदार अशा अनेक भूमिकांतून जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयाच्या जवळपास ५०० च्या वर साहित्यात व कलेत रस असणाऱ्यांनी घर बसल्या साहित्याचा आनंद घेतला.

या व्यतिरिक्त कलाकारांना त्यांच्या कलाकृती (स्वनिर्मित) पोस्ट करण्याकरिता कलादालन,  स्वलिखित पुस्तक / आवडलेले पुस्तक यांच्याबद्दल माहिती देण्याकरिता पुस्तकविश्व, तसेच  पुस्तकाव्यतिरिक्त आपल्या संस्थेची / उत्पादनाची / व्यवसायाची विनामुल्य जाहिरात करण्याकरिता जाहिरात विभाग असे असे तीन स्वतंत्र डॉक बनवण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन ऑनलाईन परंतु पारंपारिक पद्धतीने झाले. संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक व संपादक, श्री.सतीश जी तांबे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी, साहित्यिक, कादंबरीकार व फिल्मसिटीचे माजी एम.डी. श्री.लक्ष्मीकांत जी देशमुख यांनी त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. १४ फेब्रुवारी रोजी साहित्याची आवड जोपासणारे करणारे कलाकार श्री.वसंत ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पारंपारिक पद्धतीने समारोपाचे संमेलन झाले. यावेळेस साहित्यिक व संपादक, सचिन जी परब तसेच चित्रपट अभिनेते व साहित्य कलेची आवड जोपासणारे श्रीराम जी पेंडसे या मान्यवरांनी त्यांचे मार्गदर्शनपर विचार मांडले. अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप करायचे योजले आहे. अध्यक्ष निवडणुक नसलेल्या या ई साहित्य संमेलनामुळे तरुण मराठी पीढी आभासी (व्हर्च्युअल) संमेलन असल्याने साहित्याकडे वळेल आणि तिचा आस्वाद घेईल, असा आशावाद श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला तर फेसबुकवर व्यक्त होताना आपण एका नव्या साहित्यप्रकाराची जोपासना करतो आहोत ह्याचे भान सतत बाळगणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने हे संमेलन मला एक महत्वाचे इव्हेंट  वाटते कारण यात विचारपूर्वक आखणी आणि कल्पक आयोजन आहे, असे मत उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष श्री.सतीश तांबे यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या जागेच्या वाद नाही.पैशाची जमवाजमव नाही.उधळण फक्त विचारांची.त्यामुळे ई संमेलनाची कल्पना खूपच आवडल्याचे मत अभिनेते श्रीराम पेंडसे यांनी व्यक्त केले. श्री.वसंत ढोबळे यांनी या ऑनलाइन संमेलनाचे व्यासपीठ, योग्य संकल्पना, अनेक विषय, साहित्तिक उत्तेजन, चर्चा, गप्पा, सर्वच उपक्रम प्रेरणादायी असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. समारोपाची सांगता सहभागी सदस्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन तसेच उपक्रम अतिथी व समीक्षक यांना संमेलनाची आठवण म्हणून ऑनलाइन सन्मानपत्र देऊन करण्यात आली. 

या अनोख्या ऑनलाइन संमेलनाद्वारे आपल्याला नवनवीन साहित्यिक, कलाकार, मित्रमैत्रिणी मिळावे जेणेकरून आपले लिखाण/कला समृध्द व्हावी, मनोरंजनासोबतच ज्ञान वृद्धिंगत व्हावे, ही इच्छा आहे आणि गत वर्षीच्या साहित्य संमेलनापेक्षा या वर्षी संमेलनाला मिळालेला वाढीव प्रतिसाद बघून ही 'छोटीशी आशा' नक्कीच पूर्ण होईल, याची खात्री आहे. या संमेलनामुळे आम्ही प्रथमच लिखाणाचे विविध प्रकार हाताळले तसेच समीक्षकांच्या सकारात्मक समिक्षेमुळे तसेच उपक्रम अतिथींच्या कौतुकाने दिलेल्या थापेने लिहिण्याची नवी उर्जा मिळाली, असे सहभागी सदस्यांनी सांगितले. 
 

संमेलनाची संकल्पना / संयोजिका  - आसावरी इंगळे
गंगाधर टिपरे (संजय पाटील), प्रदीप मार्कंडेय, प्रशांत रणसुरे, मिलिंद जोशी यांचे सहकार्य मिळाले.

**********************

संमेलनाबद्दल काही सहभागी सदस्यांच्या प्रतिक्रिया
@Prashant Ransure 
संवाद साधनं ही तर माणसाची सर्वात महत्वाची मूलभूत भावनिक गरज. आपल्याला अभिव्यक्त होता येतं आणि त्याची दखल घेतली जाते याच्याएवढी समाधान देणारी गोष्ट जगात दूसरी नसावी. कोणत्याही साहित्य संमेलनाचा उद्देश "देणं" हाच. समाजाची वाटचाल वैचारिक प्रगतीच्या दिशेनं होत आहे किंवा नाही हेच त्याच मुख्य प्रयोजन.यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला असं वातणं की आपण ही समाजाचे एक दखलपात्र भाग आहोत ही गोष्ट नवनिर्मितीस प्रेरणा देणारी असते.रेणुका आर्टस ई-साहित्य संमेलनाने कुणाला काय दिले हे प्रत्येकाने ठरवावे. पण मला अभिव्यक्तीचा एक कमालीचा आनंद दिला हे नक्की. आपला मित्र परिवार, कुटुंब, सहचारी यात बरेचसे आपल्या वैचारिक/भावनिक पातळीवर जगतील याची शास्वती फार थोड़ी असते किंबहुना बरीच दुर्मिळ असते. ( हे पण एक बोचरं शल्यच !) ती भावनिक भूक शांत करण्याचं काम रेणुका ई-साहित्य संमेलनानं केलेलं आहे यात कुठलीच शंका नाही. आणि प्रत्येकामधे "हम कुछ है !" हा स्वानंद भाव जागृत करून जात आहे. आपले दैनंदिन व्यवहार सांभाळत साहित्य संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थिती लावनं खुप दुर्मिळ साहित्य प्रेमिंना शक्य होत असतं, पण तंत्र समाज माध्यमानं क्षणात संमेलनाशी जोडण्याची मुभा आपणा सर्वांना आज प्राप्त करून दिली. हे इतकं प्रभावी ई-साहित्य संमेलन आयोजित करण्याचं संपुर्ण श्रेय या ई- साहित्य संमेलन संयोजिका Asawari Ingle जी यांना जातं. असावरीजी मी तुमचे आभार मानणार नाही कारण त्याने इतक्या महान कामाची किंमत मला आभार व्यक्त करून चाकोरीत बद्ध करायची नाही. 
अप्रतिम .. अद्वितीय .. सर्वसमावेशक ... प्रबोधनात्मक .. निर्विवाद ... अहम् शुन्य ... मायमराठी ला वृद्धिंगत करणारी ...स्वेछेनं सहभाग घ्यावं असं वाटावं ...  हेच या ई-साहित्य संमेलानाचं यश !!! Asawari Ingle जी आपला हा पुढाकार साहित्य संमेलन शब्दाला एक वेगळी कलाटणी देणार आहे.

@Vaibhav Joshi 
मला आपल्या फेसबूक , व्यक्तीमत्व विकास यात भाग घेता आला नाही . पण मनोगताच्या निमित्ताने आता व्यक्त करतो . खरच फार छान उपक्रम आहे हा ! या निमित्ताने जग जवळ आले आहे याचे प्रत्यंतर आले. प्रत्येकाला सहभागी होता येईल असा उपक्रम . ज्याला लिहीता येत त्याची उमेद वाढ होण्यास मदत मिळेल याने ! आणि सहजगत्या व्यक्तीमत्व विकासही ! जाणकार समिक्षकां कडून मिळालेले मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे ! स्वलेखनाची पातळी कळाली त्यामुळे ! सर झहीर शेख , मिलींद श्री देशपांडे , आसावरी ताई यांसारख्या विचारवंतांशी मैत्री झाली ! खरच खूप बरे वाटले सहभागी होऊन . ह्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा ! धन्यवाद ! मला सहन केल्या बद्दल ! 

@Devendra Deshpande 
मी रंगदेवतेला वंदन करुन  संमेलनाला उपस्थित राहुन आपल्या कलाकृती सादर करुन ह्या रंगमंचाची शोभा वाढवणारया सर्व कवी, लेखक, चारोळीकार नाट्य लेखक,चित्रकार रसिक यांचे अभिनंदन करतो,त्याच बरोबर आसावरी ताईंचे मनापासुन धन्यवाद मानतो की त्यांनी online E साहित्य संमेलन आयोजीत करुन माझ्यासारख्या नवोदीत लेखकास सहभागी करुन माझी कला सादर करण्यास मला संधी दिली ...त्याचबरोबर माझ्या  सादरीकरणावर ..समीक्षा  ...अभीप्राय..मत ...परिक्षण ..करणार्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद मानतो ...  संमेलनाचे हे २ रे वर्ष असुन त्यास मिळणारा प्रतिसाद पहाता ह्या उपक्रमास कायम यश मिळेल असा दुर्दम्य आशावाद वाटतो. मायमराठी ची सेवा करण्याची व तीची जपणुक करण्याचा हा एक सकस मार्ग आहे असे वाटते. कारण भाषा संवर्धन करणे हे फक्त शासनाचे कर्तव्य नाही तर समाजाला त्यात सामील व्हावच लागेल. आज जीवन इतक धावत झालय की प्रत्येक गोष्ट पटापट बदलत आहे. नवनविन तंत्रज्ञान बाजारात येउ पहात आहे. मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा मिळाला हि चांगल्या गोष्टींची नांदी आहे. राजीव सांगरोळकर अतिशय स्तुत्य असा हा इ-संमेलनाचा उपक्रम आपण राबवत आहात ,त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. व्यक्तिश: प्रत्येक मांडलेल्या भावनांची दखल घेतली जाउन प्रोत्साहनपर प्रेरणा देण्याचे जे प्रयोजन आपण केले त्याला माझा सलाम ! आवश्यक तेथे चिमटे तर कधी कोपरखळी मारून प्रेमवजा सूचना /सुधारणा निदर्शनास आणून देण्यातही आपण कमी केले नाही, ज्याचा पुढील वाटचालीस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. एकाच छताखाली नाविन्यपूर्ण विविधतेने नटलेल्या साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी रसिक वाचकांस आपण प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपले अनेक आभार ! संपूच नये कधी हा सोहळा, निरंतर चालत रहावा मेळा, अगदी असंच वाटतंय ! सदर इ- संमेलन यशस्वीपणे साजरे होण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले, तसेच वेळात वेळ काढून वेगवेगळ्या समीक्षकांनी येथे येउन अमुल्य अभिप्राय दिले, त्या सर्वांना शतश: धन्यवाद देऊन, मी माझे छोटे मनोगत येथे पूर्ण करतो !

@Manisha Waingankar 
मनोगत...!! एफबी वर रेणुका आर्टस् च्या ऑन लाइन साहित्यसंमेलनाची पोस्ट पाहिली आणि लगेच सहभागाची नोंदणी केली..इतका हा उपक्रम आवडून गेला.नंतर संमेलनाचे स्वरुप कळल्यावर तो आनंद द्विगुणीत झाला..कारण फार सायास न करता वेगवेगळे विषय थोडक्यात मांडायची संधी प्राप्त झाली आणि त्यात तितके शक्य सहभागी व्हायचे हे ओघानेच ठरून गेले..!घर ,ऑफीस आणि इतर व्यवधाने सांभाळून एखाद दोन विषय वगळता , विषयानुरूप इथे नेटाने काही लिहीण्याचा प्रयत्न केला( जे मी एरवी वेळेच्या सबबीखाली टाळत आलेली आहे)..कथा आणि नाट्यप्रसंग हे लेखन मी प्रथमच हाताळले..!! ते मी बर्‍यापैकी जमवले हे समीक्षकांकडून जाणता आले अर्थातच या संमेलनामुळे स्वत:ला आणखी आजमावण्याची संधी मला घेता आली.इथे नवीन कवी,लेखक,व्यासंगी यांच्याशी संवाद ओळख झाली,मैत्री झाली. सर्वच जणांनी सर्व विषय विविध पद्धतिने आणि शैलीने मांडलेले वाचायला मिळाले.त्यावर समीक्षकांची उचित परीक्षणे,मते वाचायला मिळाली त्यामुळे दृष्टीकोनात भर पडली...खूप काही लिहिता येईल पण थोडक्यात सांगायचे तर या ई संमेलनाच्या या उपक्रमामुळे, चळवळीमुळे एक छान ,संपन्न अनुभव आणि अभिजात आनंद गाठीशी आला..!! त्याबदद्ल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन..मन:पूर्वक आभार...आणि हा उपक्रम घडविण्याचे श्रेय अर्थातच आसावरी इंगळे यांचे आहे. त्यासाठी त्यानी खूप मेहनत घेऊन आणि वेळ देऊन संघटित पणे काम केले आणि ही ई- साहित्यिक चळवळ नीटनेटकी ,,खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पाडली आहे... त्याबदद्ल त्यांचे अभीनंदन आणि मन:पुर्र्वक आभार..!!!

@Pralhad Dudhal 
रेणुका आर्ट्स ई साहित्य संमेलन - २०१५' संमेलनाबद्दलचे मनोगत. नमस्कार,अशा प्रकारच्या ई संमेलनात मी प्रथमच सहभागी झालो आहे किंबहुना एका साहित्यविषयक उपक्रमात सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे!मी आतापर्यंत अगदीच मर्यादित स्वरूपाचे(कविता/लेख) लिहित आलो आहे.आसावारीताईच्या या उपक्रमामुळे विविध प्रकारचे लिखाण हाताळून जाणकारांसमोर सादर करता आले,एकप्रकारे हे स्वत:ला आजमावणे होते!संमेलनातील तीन उपक्रम वगळता मी बाकी उपक्रमात यथाशक्ती सहभाग नोंदवला.या संमेलनामुळे आपण जे काही लिहितो ते जाणकारांना आवडते का,लिखाणातल्या कमतरता काय आहेत,साहित्यातले कोणते प्रकार आपण चांगले हाताळू शकतो,कोठे सुधारणा आवश्यक आहे यासंबंधी मान्यवर साहित्यकांकडून समीक्षा व चिकित्सा करून मिळाली! आपण लेखक/कवी म्हणून किती पाण्यात आहोत याचाही अंदाज आला!

@Çhetan Thakare 
आसावरी ताई मागील वर्षी प्रमाणे यंदाही छान अनुभव आला, अनेकांचे विचार, त्यांची लेखनाची पद्धतही पाहता आली, पण यंदा बिझी schedule मुळे मला जास्त वेळ देता आला नाही याची खंत नेहमी राहील पण हा प्रवास असाच अनेक वर्षे चालू राहील अशी आशा ठेवतो आणि पुढच्या संमेलनासाठी भरभरून शुभेच्छा देतो ... विजयकुमार देशपांडे 'मला लिहिता येत नाही'.. 'मला वाचता(वाचावे कसे-ह्या दृष्टीकोनातून-) येत नाही'.....असे इथे येणारा  प्रत्येकजण म्हणत .. आता विचार करत राहील... 'मला लिहिता कसे आले' , 'मला वाचायचे कसे' हे कधी माहित झाले, ते कळलेही नाही ! इतका छान उपक्रम नेटाने १४ दिवस चालू ठेवणे हे येरागबाळ्याचे काम नोहे ! समीक्षक परीक्षक  आस्वादक टीकाकार इ. निरनिराळ्या भूमिकातून सर्व लेखक-वाचकांची मर्जी वेळप्रसंगी सांभाळून, आलेल्या विविध प्रकारच्या विविध तऱ्हेच्या साहित्यावर आपली टिप्पणी देणे - हे देखील कौशल्याने काही पथ्ये सांभाळून पार पाडणे - हे जिकीरीचे काम यशस्वी रीत्या पाडणारे समीक्षक/उपक्रम अतिथी दिसले . कुणा कुणाचे आणि किती कौतुक करावे, तितके थोडेच ! सर्वांनाच मनापासून दाद द्यावी लागेल. शाब्बास ! "संयोजिका" यांनी हा एकखंबी तंबू सर्वाना सांभाळत किती कौशल्याने पेलला असेल, याची कल्पनाही करवत नाही ! "रेणुका आर्ट्स खुले इ-साहित्य संमेलन" पुढील वर्षी याहीपेक्षा जोरदार होईल, यात शंकाच नाही. सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांचे अभिनंदन !! प्रमोद देव संमेलन आयोजित करणं आणि ते यशस्वी करणं हे खरं तर एका व्यक्तीचे काम नाही...तरीही आसावरीजींनी हे अशक्य काम एक हाती करून दाखवलं, ह्याबद्दल मी त्यांना शाबासकी देतो....तसंच ह्या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या समस्त लेखक, वाचक आणि समीक्षकांचेही त्यांच्या सक्रिय योगदानाबद्दल अभिनंदन करतो. मी इथे सातत्याने जरी उपस्थित राहू शकलो नाही तरी अधूनमधून हजेरी लावत होतो....ह्या संमेलनामुळे जे आधी लिहीत नव्हते ते लिहीते झाले....ही खूप मोठी उपलब्धी आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते...तेव्हा मंडळी, असेच लिहीते राहा आणि अशीच संमेलन प्रत्येक वर्षी भरवून ती यशस्वी करत राहा. 

@आशा नवले 
सगळ्यात आधी आसवारीचे तुझे अभिनंदन आणि धन्यवाद,मागच्या वर्षी काय आहे म्हणून अशाच भाग घेतला.पण मी जेकाही लिहिले ते इतरना आवडले .आणि आपण पण काही लिहू शकतो हा विस्वास आला .आज मी जे काही लिहित आहे ते तेव्हा पासूनच .छान उपक्रम .मला कविता चारोळ्या येत नाही पण बाकी याच्या मध्ये मी सहभाग 

@Rashmi Waregaonkar 
Atishay sundar upkram asawarila kautukachi thaap aani samikshakanche aabhaar aamhala margdarshan kelyabaddal sarwanche lekhan Atishay sopya shabdat mnala bhidale asawari ase  upkram nehamibrabawat jaa ethe spardha nahi mhanun pratyekjanjast mast wyakt jhala sarwanche Abhinandan majhyasahitaani punachh aabhaar

@Shilpa Dhomney 
'रेणूका आर्ट्स' तर्फे आयोजित ''ई साहित्य संमेलनात'' गेले 3 - 4 दिवस काही अपरिहार्य कारणास्तव मी सहभागी होऊ शकले नाही. अर्थात ''बोचरे शल्य'' म्हणून या प्रसंगाने मनात जागा घेतलीय. असो. अशा प्रकारच्या online उपक्रमात मी पहिल्यांदाच सहभागी झाले. पण या साहित्य संमेलनाने मला काय काय दिले याची उजळणी सुद्धा मला खूप आनंद देते. संमेलनाची रुपरेषा जाहीर झाल्या पासूनच या आनंदाला सुरुवात झाली. आनंद, नवनवीन मित्रमैत्रिणी, वेगवेगळ्या प्रकारचे लेखनप्रकार हाताळण्याचा अनुभव, अनुभवी समिक्षकां कडून मार्गदर्शन,वाचना साठी भरपूर साहित्य मेजवानी अशा अनेक गोष्टी या संमेलनाच्या निमित्ताने माझ्या समोर हजर झाल्या. इतरांचे अनुभव वाचताना त्या सर्वांची एक वेगळीच ओळख झाली. संमेलनातील आवडती कविता , आवडते पुस्तक या उपक्रमांमुळे काही परिचित, अपरिचित पुस्तकांची ,कवितांची उजळणी,ओळख झाली. 'चला बालपण जगू या' म्हणत बालपणीच्या अनेक विस्मृतीत गेलेल्या आठवणीची सहल घडली. 'अबोल माझ्या मना' हा विषय अनेक नवनवीन कवी आणि कविता समोर घेऊन आला. एकत्र कुटुंब विरुध्द विभक्त कुटुंब या चित्रावरील तसेच फेसबुक आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर झालेल्या चर्चेतून लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन जाणून घेता आले. एकूणच दोन आठवडे चाललेल्या या साहित्य मेजवानीची गोडी मनात रेंगाळत ठेवून पुढील संमेलनाची वाट पहायची हे नक्की. अनेकांना एकाच वेळी इतका मोठा आनंद दिल्या बद्दल आयोजकांचे मनापासून आभार. उत्तरोत्तर आयोजकांना अशाच नवनवीन कल्पना सुचु देत जेणेकरून वरच्यावर आम्हालाही आनंदी होता येईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.पुढील वाटचालीस सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

@Raj Deo 
रेणुका आर्टस् ई साहित्य संमेलन ...ची पहिली पोस्ट वाचली आणि उत्कंठा वाटली..नंतर कधी गुंतत गेलो कळलेच नाही. इतका हा जवळीक वाटणारा उपक्रम आहे..उद्या तो संपेल ह्या जाणिवेनेच भरून येते..एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते..मला मराठी टाइप करण्याची समस्या होती..ती आसावरीजी नि चटकन सोडवली,अगदी हाताला धरून प्रत्येकाला या उपक्रमा मध्ये आणले,हे अगदी सहज लक्षात येते..साहित्यातील त्यांची जाण..सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा स्वभाव,उपक्रमाचे नियोजन बद्ध संचालन..हे त्यांच्या मुळेच शक्य झाले..यात तील मात्र शंका नाही.... मला जे जे जमले ते ते मी मांडण्याचा प्रयन्त केला..समीक्षकांच्या सामिक्षांनी नि आजून शिकायला मिळाले. हे हि काही कमी नव्हते.उत्तम समीक्षक या उपक्रमाला त्यांच्या मुळेच लाभले..हे हि तितकेच खरे... औपचारिक उदघाटन करून सुरु झालेला हा प्रवास " पुस्तक परिचय " विश्वात घेऊन गेला..मन अनेक लेखकांना भेटून आले.पुस्तकांची धुंदी विरते न विरते तोच" माय मराठीचे जतन - ज्ञात असलेल्या म्हणी/वाक्प्रचार/श्लोक" भेटीला आले आणि मन अजून रंगले.. कविकल्पना - ‘अबोलमाझ्या मना’ ने तर अतर्मुख केले.सुंदर कविता,सुंदर समीक्षा वाचायला मिळाल्या. चर्चासत्र ,चारोळी ने खूपच रंगत वाढवली. मनोरंजन - 'चला बालपण जगू या.मध्ये तर परत एकदा लहान होऊन बालपण जगता आले, ते या अस्मर्नीय उपक्रमा मुळेच हे नमूद करावेच लागेल. रसग्रहण करायची खूप इश्चा होती पण खूप अवघड वाटत होते..ते कसे करावे, हे जाणकारा कडून शिकायला मिळाले.... परिसंवाद - ‘फेसबुक व व्यक्तिमत्व विकास' या विषयावर बरेच काही जाणून घेता आले..लिहता आले.कथामाला - चला कथा लिहून पाहू : या सदरात 'अर्धा प्याला भरलेला..' हे सकारत्मक विचार मना समोर ठेवून छान कथा लिहिता आली..समीक्षा आईकून तर खूपच बरे वाटले ."बोचरे शल्य " नि मनाची वाट मोकळी झाली. या उपक्रमाची सांगता आत्ता होईल हेच माझे "बोचरे शल्य " नाट्य प्रसंग हि मनाला स्पर्शून गेले..असा हा विविधरंगी, मिश्रित भावभावनाचा अनोखा प्रवास दीर्घ काळ नक्कीच स्मरणात राहील..आणि मन आतुरतेने परत हे सगळे अनुभवायला, आता पासूनच आतुर आहे.. या निमित्ताने जे नवीन मित्र मिळाले, ज्यांनी ज्यांनी या मध्ये आपला सहभाग दर्शवला त्या सगळ्या न चे आभार..समीक्षकांचे,..आथिति..लेखक मित्रांचे आभार..मला या मध्ये समावून घेतलेत या बद्दल आभार..सगळ्यांना पुढील वाटचालीस सुभेच्सा......या सुंदर उपक्रमाला सलाम..

@Shankarr Patil 
एक खूप सुंदर, स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम! मन:पूर्वक अभिनंदन ताई ! प्रत्येक माणसामध्ये एका सुप्त कलाकाराचा वास असतो. यातील काही स्वत:च जागे होतात, तर काही अपघाताने जागे होतात. काहींना मात्र कुणीतरी गदागदा हलवून जागे करावे लागते. आणि हेच काम ताईनी केलंय. अभिव्यक्त होण्यासाठी यासारखा दुसरा मंच शोधूनही सापडणार नाही. ताईंनी लोकांना लिहीतं केलं. ज्या कुशलतेने या उपक्रमाचे नियोजन आणि कार्यान्वयन ताईंनी पार पाडले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. वेळेअभावी बऱ्याच उपक्रमात सहभागी व्हायची इच्छा असूनही होता आले नाही, याची खंत आहे. पण जितका सहभाग घेता आला, तेवढा प्रयत्न केला. असे उपक्रम वारंवार व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करतो. नवीन उपक्रमांना मनापासून शुभेच्छा !

@शिरगावे विशाल 
चंदनाला सांगाव लागत नाही की मी किती सुगंधित आहे. तसचं आहे हे संमेलन. खरचं अशा संमेलनाची कल्पना कधीच नव्हती ,,, संमेलन ते ही फेसबुकवरच. खरंतर समाजात तळागाळात खुप कवी -लेखक कलाकार दडलेले असतात पण त्यांना व्यासपीठ नाही मिळत आणि मिळालचं तर त्याची कदर नाही होतं.. पण या संमेलनात ज्यांनी- ज्यांनी सहभाग घेतला त्यांनी मनापासून संमेलन हसत-खेळत पार पाडलं व त्यांची सर्वांनी कदर पण केली.  आयोजकांनी सर्वांना हक्काच व्यासपीठ मिळवुन दिलं त्याबद्दल त्यांचे खुप धन्यवाद!

@Dhananjay Patil 
खुप सुंदर संमेलन आयोजन...आसावरी दीदी तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत...व्यस्त असूनपण इतके सुंदर संमेलन तू आयोजित केलेस...वेळोवेळी शंकाचे निरसनपण केलेस...अतिशय सुंदर उपक्रम होते संमेलनात खुप मजा आली...या सहित्य दुनियेत...खरच मनाला आनंदी आनंद होतो...नवकवीना तू संधि दिलीप...मान्यवर समिक्षकानी वेळात वेळ काढून उत्तम परिक्षण केले...आज संमेलनाचा समारोप आहे...पण हे असेच रहावे वाटतय...धन्यवाद आसावरी दीदी...आणि सर्व मान्यवारांचे...आभार...काही ओळी...शब्दांची दुनियाच न्यारी...मनाला देते उभारी...भावना मनाच्या शब्दातुनी व्यक्त होतात...काव्यानंद मनास देऊनी जातात... संमेलनाकरीता....पार पडले सुंदर संमेलन...साहित्यप्रेम हेच आमुचे जीवन...पुढील संमेलन याहून सुंदर...व्हावे या शुभेच्छेसह...धनंजय पाटील....डी.पी.

@Gangadhar Joshi 
एका कवितेच शीर्षक " पेरते व्हा " असं होतं.आसावरीने " लिहीते व्हा " असं साहित्य संमेलन "  घडवल.खूप छान वाटते. 

@अॅड.शिरीष शिंदे 
मी साहित्य संमेलनं पाहीलीत अनुभवलीत ; आता घुमानलाही जाणार आहे पण परबसाहेब म्हणतात तसं हे अनोखं संमेलन आहे कारण त्यासंमेलनाशी दोन शब्द मी लहानपणापासुन वर्तमानपत्रात वाचत आलोय एक शब्द "गाजणे" राजकारण, निवडणूका, गटतट, हेवेदावे, मतांची पळवापळवी; साहित्य कशानी खातात याची गंधवार्ताही नसणा-या मलिद्यासाठी धडपडणा-या बाह्यशक्तींनी त्या संमेलनावर काबू मिळवलाय व या अशा सर्व कारणास्तव संमेलन गाजते ; पण नंतर सर्व काही निवळुन ते पार पडते तेव्हा लगेच वर्तमानपत्रात 'संमेलनाचे सूप वाजले' ही बातमी हमखास असते: या वाजणे व गाजणेच्या पार्श्वभूमीवर आपल्याही संमेलनाचे आज सूप वाजले तरीही या आठवणीं नेहमीच चिरस्मरणात राहतील यात शंका नाही..

@Nitesh G Raut 
ताई तुमच्याजवळ एवढा उत्साह आणी एवढी कल्पकता कशी आहे आश्चर्य वाटतं. आमच्या सारख्या नवख्यांना तुमच्यामुळे साहीत्यजगाची ओळख झाली त्याबद्दल मनापासुन आभारी आहे ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.