मुंबई : स्पर्धेच्या आजच्या युगात माणूस एवढा धावतोय की त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत आहे. आज माणसाचं आरोग्य खालावलं आहे त्यामुळे त्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केली तरी आरोग्य हे चांगलं राहू शकतं.
१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवन बनवण्याच्या आधी किंवा जेवनापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.
२. घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खासकरून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा.
३. जेवन बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका.
४. आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा.
५. तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवनाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.
६. आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या.
७. जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम.
८. झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.
९. मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.
१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.