www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`डोक्याला ताप नको देऊ बे...` असं म्हणत टेन्शन घेण्यापासून आपण दूर पळता... पण, यापुढे असं काही एक करण्याची गरज लागणार नाही... कारण, डोकं पूर्ण रिकामं ठेवण्यापेक्षा डोक्याला थोडा ताण दिला, तर तो आपल्यासाठी उपयुक्तच ठरतो... अहो, असं आम्ही नाही तर नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाचा हा निष्कर्ष आहे.
`चिंता ही चिते समान आहे...` जुन्या वळणाची ही म्हण... आपण सर्वांनीच ऐकली असेल. त्याचसोबत चिंता करू नका, चिंतेने आलेला तणाव हा नुकसानकारक ठरतो, असे सल्लेही... परंतु हाच तणाव आता आपल्याला फायदेशीर ठरू शकतो, असे एका संशोधनातून स्पष्ट करण्यात आलंय.
या संशोधनानुसार, आपल्या शरीरात कॉर्टिकोस्टरॉन नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार होतो. आपली मानसिक क्षमता वाढविण्यास स्ट्रेस हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो.
त्यामुळे थोडा तणाव असला तरी काळजीचे कारण नाही, त्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्नात असाल तर थांबा आणि विचार करा. कारण वाढत्या तणावाने आपल्याला एखादी गोष्ट अधिक शिकण्यास मिळते, असे या संशोधनातून सांगण्याचा प्रयत्न होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.