मुंबई : अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत.
आपण योग्य तऱ्हेने जेवण (लंच) घेतले नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. मात्र, जेवणाबाबत तुम्ही योग्य टिप्स वापरल्यात तर तुमचे आरोग्य ठिकठाक राहते.
लंच ब्रेकच्यावेळी जिममध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही चाललात तरी पुरेसे होते. तुम्ही एका जागेवरून उठून बाहेर जाऊन ताजी हवा घ्या.
तुम्ही केव्हाही घरून डबा ऑफिसमध्ये आणणे चांगले. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे जेवण घेऊ शकाल.
आपल्या आवडीचे जेवण बाहेरुन आणा आणि आपल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत घ्या. त्यामुळे तु्म्हाला आनंद मिळेल.
आपल्या आवडीचे लंच ऑर्डर करा. मात्र, तुम्ही ते घेण्यासाठी जात असाल तर त्याच ठिकाणी ते जेवण बसून करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.