मुंबई : बेकिंग सोड्याचा वापर जेवणात अथवा बेकिंग फूडमध्ये केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र केसांतील कोंडा घालवण्यासाठी तसेच दातांवरील पिवळेपण दूर करण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर होतो.
हे आहेत फायदे
तुमच्या केसात कोंडा असेल तर काही दिवस शॅम्पू लावणं बंद करा. त्याऐवजी बेकिंग सोडा केसांच्या मुळाशी लावा. कोंडा निघून जाईल.
बेकिंग सोड्याच्या वापराने केसांना तसेच त्वचेला चमक मिळते. आंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाका या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. कंडीशनरमध्येही बेकिंग सोडा मिसळून केस धुतल्याने केंसाची चमक वाढते.
दातांचे पिवळेपण घालवण्यासाठीही बेकिंग सोडा फायदेशीर आहे. यासाठी थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि बोटाने हळूहळू दातांवर मसाज करा. यामुळे दातांवरील पिवळेपण दूर होईल.
ब्लॅकहेडची समस्या असेल तर बेकिंग सोड्यात थोडं पाणी मिसळून पेस्ट करा. ब्लॅकहेड असलेल्या जागी ही पेस्ट लावा. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.